नांदेड : नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी; आ. जवळगावकर

प्रशासनाला दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना
Nanded Panganga Project Isapur Dam Water
Nanded Panganga Project Isapur Dam Water
Updated on

हदगाव - पैनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के इतका झाल्याने हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले असून यासंदर्भात प्रशासनाने दक्ष राहण्याच्याही सूचना आमदार महोदयांनी दिल्या आहेत.

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ५० च्या जवळपास गावे ही नदीकाठी वसलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी नदीकाठच्या गावांना इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा फटका बसत असतो. सध्यस्थितीत ईसापुर धरणात ७५ टक्के पाणीसाठा असल्याने धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धरणातील पाणी हे कोणत्याही क्षणी पैनगंगा नदीपात्रात सोडल्या जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी वेळीच सावधानगिरी बाळगावी अशाही सूचना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर ईसापुर धरणातून नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारची वित्तहानी होऊ नये याकरीता प्रशासनाने काळजी घ्यावी, प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांना जागृत करावे जेणेकरून नदीकाठच्या गावातील शेतकरी सावध राहतील. प्रशासनाने याबाबत कुठलाही हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रशासनाला दिल्या असल्याने प्रशासनही याबाबतीत दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावे लागले होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पूर येऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ईसापुर धरणातील ७५ टक्के पाणीसाठा पाहता ईसापुर धरणाची पूर नियंत्रण अधिकारी तथा पैनगंगा प्रकल्प व्यवस्थापन उपविभागीय अभियंता याबरोबर सर्वच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले असून त्याअनुषंगाने उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगुंडे यांनी याबाबत हदगाव तहसील कार्यालयाला लेखी पत्राद्वारे सतर्क राहण्याच्या सूचनाही देखील दिल्या आहेत.

हदगाव व हिमायतनगर तालुक्यात नदीकाठी जवळपास ५० गावे असून त्यातच ईसापुर धरणाचा पाणीसाठा हा ७५ टक्क्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही क्षणी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाईल व नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीचा धोका निर्माण होईल. त्यामुळे नदी काठावरील गावांना सावधानीसाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

- माधवराव पाटील जवगावकर, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.