नांदेड पोलिस दलाला पुन्हा हादरा; सहाय्यक फौजदाराचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाच्या साथीमुळे नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून पोलिस त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिवस रात्र बंदोबस्तात आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय कोळी हे बंदोबस्त गस्तीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली.
सहाय्यक फौजदार कोळी
सहाय्यक फौजदार कोळी
Updated on

मांडवी ( जिल्हा नांदेड) : येथील मागील तिन वर्षापासून पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय कोळी (Vijay koli asi) यांचे मंगळवारी (ता. ११ ) सकाळी बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय, मांडवी (mandvi police station) येथे कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ते मुळचे देगलुर तालुक्यातील असून त्यांच्या पार्थीवावर मांडवी येथेच सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मांडवीकडे रवाना झाले. Nanded police force shaken again; Assistant coroner's death by corona

कोरोनाच्या साथीमुळे नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असून पोलिस त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिवस रात्र बंदोबस्तात आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय कोळी हे बंदोबस्त गस्तीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. येथील कोरोना सेंटरमध्ये ( ता. १० ) रोजी तपासणी केली. या तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परन्तु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांनी हे घोषीत केले. विजय कोळी हे मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पोलिस विभाग व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा - वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या विरुद्ध जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना

विशेष म्हणजे सोमवारी (ता. १०) ते पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना नांदेडला परिवाराकडे जा असा सल्ला दिला होता. तेव्हा ते म्हणाले की इकडेच उपचार घेतो. मी पॉझिटिव्ह आहे तिथे गेल्यास परिवार पॉझिटिव्ह होईल, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण आहे ते सुखी तरी राहतील. असे हे त्यांचे मित्रांसाठी शेवटचे वाक्य ठरले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()