नांदेड : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाग्यनगर ठाण्याच्या पोलिसांनी गस्तीदरम्यान, वाहन तपासणी करून छत्रपती चौकातील एका हॉटेलची तपासणी केली, यात एक लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले. या रकमेबाबत संबंधित एजन्सीज चौकशी करत आहेत.