latest Vaccination News: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ६० वर्षांवरील सर्व प्रौढांचे व १८ वर्षांवरील जोखमीच्या गटातील लोकांच्या बीसीजी लसीकरणास महापालिकेच्या वतीने ता. एक सप्टेंबरपासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत केवळ दोनशेवर लाभार्थींचे लसीकरण होऊ शकले आहे. बहुतांश जण याबाबत अनभिज्ञ असून, व्यापक स्वरूपात लसीकरणाची जनजागृती होण्याची गरज असल्याचे चित्र आहे.