नांदेड : प्रदिर्घ वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता.चार) पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. या पावसाने तळपते उन्ह आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला असला तरी शहरातील नवा मोंढा, बाबानगर भागातील मुख्य रस्त्याल साचलेल्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचा जोर काहिसा कमी झाला होता. ता.१५ ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच पावसाचे आगमन झाले. दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. यानंतर पावसाने उघडीप दिली. दोन, चार दिवसानंतर पाऊस पुन्हा होईल असे वाटत होते. परंतु, वीस दिवसांपासून पाऊस गायब झाला. लांबलेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच बदल जाणवत होता. दिवसभर तळपते न आणि रात्रीच्या वेळी उकाड्याने नागरिक बेचैन झाले होते. पुन्हा एकदा उन्हाळा सुरु झाला की काय, असे जाणवत होते. तर दुसरीकडे लांबलेल्या पावसामुळे शेतात उरली सुरली पिके मान टाकत होती. यामुळे ही पिके धोक्यात आली.
दरम्यान शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. दोन तास चांगला पाऊस झाला. रविवारी पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तळपते उन आणि रात्रीच्या उकाड्यापासून नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र या पावसाने शहरातील नवा मोंढा, बाबानगर भागातील मुख्य रस्त्यावर साजलेल्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. नवा मोंढा परिसरातील उज्व गॅस गोडाऊन समोर तसेच या परिसरात कॉंग्रेस भवन कार्यालय असतानाही महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेने गोडाऊन परिसरात साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले.
बाबानगर येथील मुख्य रस्त्यावरही पाणीच पाणी साचले होते. यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागली. ऐन सणआसुदीच्या काळातही नागरिकांना खोदलेले रस्ते आणि साचलेल्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल महापालिकेने घेऊन पाण्याचा निचरा करावा अशी मागणी येथील रहिवासी नामदेव कट्टमवार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.