Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले ढगफुटीसदृश पाऊस

सहा तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर, वाहतुकीवर परिणाम
Nanded  Rain Update
Nanded Rain UpdateSakal
Updated on

Monsoon Update : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून देगलूर, बिलोली, हिमायतनगर, हदगाव, धर्माबाद, मुखेड तालुक्यांत अतिवृष्टी झाली. त्याशिवाय ३६ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दोन मंडळांत दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेल्या भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. काही ठिकाणी खरिपातील कोवळ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पुरात वाहून गेल्यामुळे माकणी (ता. मुखेड) येथील धोंडिबा गोविंद होळगीर या तरुणाचा मृत्यू झाला.

सहा तालुक्यांत गुरुवारी (ता. २०) रात्री व आज झालेल्या पावसाने झोडपून काढले. बिलोली, धर्माबाद, किनवट, हदगाव, देगलूर तालुक्यांतील नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक बंद झाली होती. मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी परिसरातील पाझर तलाव फुटला.

बिलोली तालुक्यातील येसगी पुलावरून पाणी वाहू लागल्याने हैदराबादकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.

गंजगाव (ता. बिलोली) येथे पुरात अडकलेल्या काही गावकऱ्यांना जेसीबीच्या साह्याने आज सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देगलूर आणि मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली.

ढगफुटीसदृश पाऊस

आदमपूर (ता. बिलोली) मंडळात गेल्या २४ तासांत २१३.७५, नरंगल बुद्रुक (ता. देगलूर) मंडळात २१० मिलिमीटर पाऊस झाला. या मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ६४.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ३२७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तो ३६.७१ टक्के आहे.

Nanded  Rain Update
Nashik Rain Alert : जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आज जोरदार पावसाचा अंदाज

दृष्टिक्षेपात पाऊस

  • मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी-येवती-जाहूर भागात ढगफुटीसदृश पाऊस

  • पुरात वाहून गेल्याने माकणी (ता. मुखेड) येथील तरुणाचा मृत्यू

  • भोकर तालुक्यात नदी-नाल्यांना पूर, शेतीचे नुकसान

  • हिमायतनगर तालुका जलमय, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली

  • नांदेड - देगलूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ बंद

  • एकलारा (ता. मुखेड) येथील शेतकऱ्याच्या ५ म्हशी, १ गाय पुरात वाहून गेली

  • बन्नाळी (ता. धर्माबाद) येथे पुराचे पाणी शिरले, दीडशे जणांचे धर्माबादेत स्थलांतर

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्याची पाहणी

Nanded  Rain Update
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

गोदावरीचे पात्र दुथडी

दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा आज एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.