Nanded Rain Update : पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा; शेत शिवारात साचले पाणी

देगलूर, मुखेड तालुक्यात समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षाच
nanded rain update rain forecast farmer agriculture weather imd
nanded rain update rain forecast farmer agriculture weather imdSakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली असल्याने थोडा फार दिलासा मिळाला असला तरी अजूनही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले आहे.

जुलैचा पहिला आठवडा उलटूनही पावसाने अद्याप म्हणावी तशी सुरुवात केली नसल्याने खरिपातील पेरण्या रखडल्या आहेत. पेरणीची वेळ टळून जात असल्याने उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकरी अजूनही धास्तावले आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पावसाची सुरुवात होत असते. परंतु यंदा मात्र खरिपातील पेरण्यांचे चित्र पालटले आहे. जूनमध्ये सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाल्याने धरणसाठ्याची स्थिती जेसे थेच आहे.

nanded rain update rain forecast farmer agriculture weather imd
Nanded : केवळ हलक्या पावसाचा शिडकावा, पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून

तर खरिपातील पेरण्यांचे कामही रखडले आहे. काही शेतकर्‍यांनी पाऊस पडेल, या आशेवर पेरण्यांची कामे आटोपून घेतली. परंतु पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र, गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह काही भागात कमी अधिक पाऊस पडल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा आशा बळावल्या आहेत.

नांदेड शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. चार) रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस तासभर होता. जिल्ह्यातही हदगाव, देगलूर आणि मुखेड तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. पाच) शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस झाला आहे.

nanded rain update rain forecast farmer agriculture weather imd
Nanded Crime News : गुरांच्या तस्करीवर पाळत ठेवल्याने ७ तरुणांना जबर मारहाण! एकाच्या मृत्यूने परिसरात तणाव

दोन मंडळात दमदार पाऊस

जिल्ह्यात मंगळवारी तुरळक भागात पाऊस झाला. हा पाऊस देगलूर व मुखेड तालुक्यातील काही मंडळात चांगला झाला. हा पाऊस देगलूर तालुक्यातील देगलूर मंडळात ७५ मिलीमीटर तर नरंगल बुद्रुक मंडळात ७४.५ मिलीमीटर झाला.

यामुळे या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर त्याच दिवशी मुक्रमाबाद मंडळात २८.६ मिलीमीटर, बार्‍हाळी १९.३, चांडोळा १५.३, खानापूर ३६, मरखेड १७.३, माळेगाव मक्ता १७.८, हाणेगाव १७.८, शाहापूर ११.५, मालेगाव १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.