Nanded Rain Update : रिमझिम पावसामुळे बळिराजा सुखावला

रिमझिम पाऊसामळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग सुरू
Nanded Rain Update
Nanded Rain Updatesakal
Updated on

नादेंड: मागील पंधरवड्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करत पाऊस पडेल, या अपेक्षेवर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. जमिनीत पुरेसा ओलावा नसतानाही अनेकांनी धुळपेरणीला प्राधान्य देत काळ्या आईची ओटी भरली. दरम्यान, जेमतेम पाऊस होऊन पेरण्यांना वेग आला होता.

Nanded Rain Update
Nanded News : शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे यश; राज्य गुणवत्ता यादीत २५ विद्यार्थी चमकले

आजमितीस कुरुळा मंडळात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाणार, अशी भीती होती परंतु आता होत असलेल्या रिमझिम पावसामुळे बळीराजाला तात्पुरता आधार मिळाला असून चेहऱ्यावर आशादायक चित्र निर्माण होत आहे.

Nanded Rain Update
Nanded News : नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

कुरुळा मंडळात शेतकरी मुख्य पिक म्हणून कधी कापूस तर कधी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतात. तर आंतरपिकासाठी तूर, मूग, उडीद पिकांचा विचार केला जातो. यंदाच्या खरीप पेरण्या लांबल्याने कापसाचे क्षेत्र घटणार, अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी केवळ ७० मिलीमीटर पावसावर पेरण्याची घाई केली.

नेहमीप्रमाणे पाऊस येईल, या अपेक्षेवर जवळपास ६५ टक्के क्षेत्रावर कापसाला प्राधान्य दिले आहे. मागील दोन हंगामात सोयाबीनचे घसरलेले दर ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कापसाची लागवड करण्यात आली आहे. तर सोयाबीन पिकाचा पेरा मात्र घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Nanded Rain Update
Nanded News : विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार - डॉ. महेश डोईफोडे

वर्षानुवर्ष खरीप ज्वारीचा पेरा मात्र कमी होताना दिसत आहे. आंतरपीक म्हणून यंदाही तूर पिकाला कमी प्राधान्य देण्यात आले आहे.

मात्र, यंदाच्या पेरण्यात शेतकऱ्यांनी बदल करत सोयाबीन लागवडीसाठी टोकन यंत्राचा वापर वाढला असून कुरुळा क्षेत्रात जवळपास ६० ते ७० हेक्टरवर आधुनिक पद्धतीचा अवलंब करत सोयाबीन टोकन करण्यात आले आहे.

कंधार कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

कंधार तालुक्यातील विविध भागात मागील पंधरवड्यापासून पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग केली होती. कुरुळा मंडळातील जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण होत असताना दोन दिवसांपूर्वी कंधार तालुका कृषी अधिकारी यांनी १०० मिलीमीटर पावसानंतर पेरण्या करण्याचे आवाहन केले आहे. मंडळनिहाय प्रत्यक्ष माहिती न घेता पेरण्यानंतर केलेले आवाहन म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.