Nanded : जबाबदार व्यक्तींनी समाजाला वाईट-चालीरितीच्या पाशातून मुक्त करावे

मौलाना खासमी; कंधारमध्ये जमीअत उलेमा हिंदतर्फे कार्यक्रम
Nanded news
Nanded newsesakal
Updated on

कंधार : केवळ मुस्लिम धर्मात जन्मले म्हणून कोणी मुसलमान होत नाही. कुराण आणि हदीसनुसार जीवन जगणारेच अल्लाह आणि पैगंम्बरांचे खरे पाईक असतात. मुस्लिम समाज आज वाईट चालीरीतीत गुरफटला गेलाय. प्रत्येकजण स्वार्थ पाहतो आहे. पैगंम्बरांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष होत आहे.

Nanded news
Nanded : बेटी बचाओ’ जण आंदोलन रॅली महाराष्ट्र आणि तेलंगणात

यामुळे समाज रसातळाला जात आहे. ही स्थिती बदलली पाहिजे. समाजातील जबाबदार व्यक्तींनी स्वतःपुरता विचार न करता समाजाला वाईट-चालीरीतीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दारुल उलम देवबंदचे मुबल्लीग मौलाना महोमद इरफान खासमी यांनी केले.

Nanded news
Nanded : माझी सालदारकी संपत आली ; हरिभाऊ बागडे

जमीअत उलेमा हिंद शाखा कंधारतर्फे गुरुवारी (ता.२७) येथील मगदुमिया उर्दू प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ‘जलसे सिरतून्नबी व इस्लाहे मुआशेराह’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जमीअतचे मराठवाडा अध्यक्ष मौलाना हबीबुररहेमान खासमी अध्यक्षस्थानी होते. मौलाना असद समदी, मौलाना शमसुलहक्क खासमी, मौलाना आबान नदवी, मौलाना युसुफखान, मौलाना मुजाहिद यारखान, जमीअतचे कंधार तालुकाध्यक्ष बबर महोमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

Nanded news
Nanded : जिल्ह्यातील १९८२ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा

मौलाना खासमी यांनी मुस्लिम समाज विशेष करून मुस्लिम तरुणांमध्ये प्रस्थापित होत असलेल्या अस्थिरतेबाबत चिंता व्यक्त केली. मद्य, जुगारच्या व्यसनामुळे समाज खाईत लोटला जात आहे. चांगले कर्म सोडून नसते उद्योग करण्याला प्राथमिकता दिली जात आहे.

Nanded news
Nanded : आता गुवाहाटीला जायची गरज नाही ; अशोक चव्हाण

लग्न समारंभ खर्चिक केल्याने मुलींच्या लग्नात विलंब होतो आहे. वर पक्ष हुंड्याला प्रतिष्ठा समजत आहे. पैगंम्बर साहेबांच्या शिकवणीचे अनुकरण करणीतून करण्याची आवश्यकता असताना त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असून समाजातील बुद्धिजीवींनी याचा विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nanded news
Nanded : हजारो शिक्षकांसाठी काळी दिवाळी

या वेळी जमीअतचे उपाध्यक्ष डॉ. गुलाम गफ्फार, सरचिटणीस आबेद खान, महोमद गोरेपाशा, ॲड. कदर बेग, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, महोमद हामेदोद्दीन, हमीद सुलेमान, जफरउल्ला खान, हाफेज महोमद अफजल, हाफेज अब्दुल माजीद, हाफेज इम्रान खान, शेख हब्बू, शेख शेरुभाई, मंजूर अहमद, सय्यद जहीर यांच्यासह शहर व परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. आबेदखान यांनी सूत्रसंचालन केले. महोमद अजीमोद्दीन यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.