घोगरी ( जिल्हा नांदेड) : परतीच्या पावसाचा फटका माळरानातील सिताफळ सुगीला बसला असून, सततच्या ढगाळ वातावरणामुळे लहान फळेही पिकली जात असल्याने, या" रानमेव्याचा" गोडवा कमी होण्याने, अल्पदरात विकावी लागत आहेत. यामुळे या सुगीवर अवलंबून असणाऱ्या वन मजुरावर मोठे गंडांतर आल्याचे चित्र आहे. आधीच संकटात सापडलेला मजूरदार या नव्या संकटाने पुरता हतबल झाला आहे.
या भागात जंगल बऱ्यापैकी असल्याने जंगलासह, शेतीच्या बांधावर, गावठाण जमिनीवर सिताफळ वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याने हा भाग सीताफळासाठी नावारूपाला आलेला आहे. प्रतिवर्षी या परिसरात अल्प प्रमाणात पाऊस होण्याने सिताफळ सुगीवर मर्यादा येत असत. परंतु यावर्षी या परिसरात पाऊस मुबलक होण्याने, सिताफळ सुगीसाठी पोषक ठरणारा असल्याने, प्रत्येक वृक्षाला विपुल प्रमाणात फळे लगडलेली पाहावयास मिळत आहेत.
गोडी नसल्याने यावर्षी ही सिताफळ सुगी धोक्यात
परंतु परतीचा पाऊस सतत होण्याने, व ढगाळ वातावरणामुळे, सिताफळ वृक्षाला लागलेली लहान फळे परिपक्व न होताच वृक्षावरची विकली जात असल्याने या रानमेव्याला म्हणावी तशी गोडीच प्राप्त न होण्याने, पिकलेल्या सिताफळाला खवय्या द्वारे मागणीच नसल्याने अल्पदरात सिताफळे विकण्याची पाळी येऊन ठेपली आहे. एरवी प्रतिवर्षी अल्प पाऊस होऊनही, शिवाय सीताफळ वृक्षाला अल्प फळे लागूनही, परिपक्व होण्याने या मधाळ रानच्या मेव्याची गोडी विशेष असल्याने खव्याची या सिताफळास विशेष पसंती असल्याने या विक्रीतून त्यांना भरपूर मिळकत मिळत असे. परंतु यावर्षी मुबलक फळे येऊनही विशेष गोडी नसल्याने यावर्षी ही सिताफळ सुगी धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
परतीच्या पावसामुळे मजुराच्या रोजंदारीवर आलेले संकट
नुकताच धोंड्याचा महिना ( अधिक मास) लागल्याने धार्मिक मान्यतेनुसार धोंड्याच्या गोडव्याला मान्यता असल्याने याच दरम्यान आलेल्या सिताफळ सुगीवर याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे सिताफळ खाणार या खव्याची व घेणाऱ्याची मंदावल्याने, याशिवाय परतीच्या पावसामुळे मजुराच्या रोजंदारीवर आलेले संकट, त्यात सिताफळ सुगी वाया जाण्याने या भागातील मजूर दाराने आता करायचे तरी काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे पीक अल्प पावसात जोमदार येत असल्याने , माळरानातील, हलक्या जमिनी सह, चांगल्या बागायती जमिनी वर (जवळपास 100 हेक्टर जमिनीवर) यावर्षी सीताफळाची लावगड झालेली आहे. कमी खर्च व भरपूर उत्पन्न मिळत असल्याने बऱ्याच बागायतदारांचा कल या सिताफळ शेतीकडे वळलेला दिसतो आहे.
- रामदास मिराशे, कृषी सहाय्यक घोगरी.
पिकलेलं सिताफळाच एक टोपलं साधारणत पाचशे ते सहाशे रुपये किमतीत जात असत परंतु यावर्षी पावसामुळ पिकलेली सिताफळ कवडीमोल किमतीत द्यावी लागत आहे. यामुळे यावर्षीची सिताफळ सुगी धोक्यात आले आहे. शेवटी विकणे कठीण बनल्याने सिताफळे झाडावरच पिकून वाया जात आहेत. परतीच्या पावसामुळे, सोयाबीन, सुगी वाया गेल्याने आता करायचे काय? हा प्रश्न पडलाय.
- मारुती आडे, प्रगत शेतकरी राजवाडी.
संपादन - प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.