Nanded News : महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप;नागरिकांची कामे खोळंबणार!

तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांसह तहसील कर्मचाऱ्यांचा समावेश!
nanded revenue department employee on strike from today talathi tehsil official
nanded revenue department employee on strike from today talathi tehsil officialSakal
Updated on

माहूर: महसूल कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकरिता विविध टप्प्यांमध्ये आंदोलन केलीत.पण,शासनाकडून कुठलेही ठोस आश्‍वासन मिळाले नाही.त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी १४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.

या बेमुदत संपामध्ये माहूर तहसिल कार्यालय मधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी होत आहे.त्यात प्रामुख्याने महसूल चा कणा असलेल्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे.

माहूर महसूल कर्मचाऱ्यांनी (ता.१४) रोजी पासून पुकारण्यात आलेल्या संप आंदोलनाचे निवेदन तहसीलदार माहूर यांना सुपूर्द करण्यात आले आहे,यामध्ये प्रामुख्याने तहसील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रभू पानोडे,सचिव डी.बी.पाचपोर यांच्यासह कर्मचाऱ्यांचे तर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश कोठारे,

सचिव शिवशंकर मुखाडे,तलाठी डी.के.हेंडगे,राम ठाकरे,संदीप जाधव,सी.पी.बाबर,दयानंद येरडलावार,विष्णू राजूरवार,ज्ञानेश्वर पेंटेवाड,शितल ढाकुलकर आणि वर्षा डाळके तर मंडळ अधिकारी विद्यासागर पाईकराव,संदीप फुलारी,

एस.के.साळसुंदर व जी.पी.कौडगावे त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.पंचायत समितीचे श्री.केंद्रे, भूमी अभिलेख विभागाचे माधव पाटील कदम आणि दस्त नोंदणी कार्यालयाचे पी.एस.कुसळकर यांच्याकडून संपाबाबत माहिती घेतली असता मंत्रालयीन आणि संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर संपाची दिशा ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली,

nanded revenue department employee on strike from today talathi tehsil official
Nanded News : रेल्वेतील चोरीप्रकरणी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथके

त्यामुळे पंचायत समिती आणि इतर विभागाचे कामकाज उद्या चालू असेल किंवा बंद हे बातमी लिहीपर्यंत समजले नाही,तहसील कार्यालय व तलाठी मंडळ अधिकारी यांचा कामकाज मात्र ठप्प असणार आहे.या आंदोलनामुळे निश्चितच नागरिकांची कामे प्रभावित होऊन शासकीय स्तरावरील दैनंदिन कामकाज देखील खोळंबण्याची शक्यता आहे.

या आहेत मागण्या

◾ जुनी पेन्शन योजना लागू करा आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करा.

◾आठवा वेतन आयेग गठीत करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी.

◾ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा.

◾रिक्त पदे त्वरीत भरा.

◾ शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना रद्द करा.

◾समुह शाळा योजनाव्दारे होणारे कार्पोट धार्जिणे खाजगीकरण रद्द करा.

nanded revenue department employee on strike from today talathi tehsil official
Nanded Crime News : विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

◾ नविन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा.

◾अनुकंपाधारकांना विनाअट नियुक्ती द्या.

◾कंत्राटी करण्याच्या धोरणाचे उच्चाटन करा

◾ सर्व भत्ते केंद्राप्रमाणे द्या.

◾चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहन चालक पद भरतीवरील बंदी उठवा.

◾पाचव्या वेतन आयोगापासुनच्या वेतन त्रुटी दूर करा.

◾ सेवानिवृत्तीचे वय ६० करा.

◾ नर्सेस,आरोग्य कर्मचान्यांच्या समस्यांचे निवारण करा.

◾महागाईला आळा घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.