नांदेड : लसीकरणयुक्त आणि कोरोनामुक्त नांदेड व्हावे

नवीन वर्षाचा संकल्प; अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
vaccination
vaccinationsakal
Updated on

नांदेड : गेल्या दीड दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे अनेक बदलांना सामोरे जावे लागले. आता ओमिक्रॉनची भीती आहे. अशाही परिस्थितीत आलेल्या प्रसंगांना, संकटांना सामोरे जात त्यातून मार्ग काढत नवीन वर्षांचा संकल्प आणि स्वागत करण्यात येत आहे. समाजात जनतेसोबत राहून त्यांच्यासाठी सतत कार्यमग्न असलेल्या नांदेडमधील महत्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांनी देखील नवीन वर्षाचा संकल्पाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच नांदेडकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Nanded should be vaccinated and corona free)

vaccination
नांदेड जिल्ह्यातील शाळा होणार चूल अन् धूरमुक्त

नवीन वर्ष महत्वाचे असून नांदेड जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त आणि कोरोनामुक्त व्हावा, या दृष्टीने सर्व टीम सोबत घेऊन आणखी जोमाने काम करणार. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण आणि खेळ याकडेही लक्ष देऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर राहील. नागरिकांनी देखील लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.

vaccination
नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’

कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये गुन्हेगारीच्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई तसेच माहितीसह कोणत्याही अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ती पुढेही चालू राहील. पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयापासून ते पोलिस ठाण्यांपर्यत तसेच निवासस्थानामध्ये वृक्षारोपण आणि सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात ऐकून त्यावर कार्यवाही करण्यासाठी त्यात काही सुधारणा करून ही व्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे.

- निसार तांबोळी, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र.

जिल्ह्यात ‘फिट नांदेड’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागाकडे विशेष करून आरोग्य, लसीकरण आणि शिक्षण याकडे लक्ष राहील. तसेच महिलांमध्ये आणि त्यातल्या त्यात गर्भवती महिलांचे लसीकरण महत्वाचे आहे. शून्य ते सहा वयोगटातील दृष्टीदोष, कर्णदोष आदीबाबत मुलांची आरोग्य तपासणी तसेच ग्रामिण भागातील मुलांना दहावीनंतर करिअर, रोजगाराच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचा मानस आहे.

- वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

vaccination
नांदेड : जिल्ह्यातील ५६० शिक्षकांवर होणार कारवाई

सर्वसामान्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नांदेड शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर स्वागत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या त्या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियोजन करतील. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरणही अंतिम टप्यात आले असून ते शंभर टक्के करण्यात येणार आहे. निजामकालीन ठाणे तसेच जुन्या पोलिस वसाहतींच्या दुरूस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

- प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक.

स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही सुदृढ नांदेड करण्यासाठी लक्ष दिले जाईल. सुरळीत पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि शंभर टक्के लसीकरण महत्वाचे आहे. घरकुलाची योजना आणखी प्रभावीपणे राबवणे, व्यापारी संकुलाची उभारणी तसेच महापालिका आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

- डॉ. सुनील लहाने, महापालिका आयुक्त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()