नांदेड : माँन्सूनबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

यंदाही दुबार पेरणीचे संकट ओढवणार का? : शेतकऱ्यांना भिती
Nanded sowing season farmers Confused about monsoon
Nanded sowing season farmers Confused about monsoon sakal
Updated on

नांदेड : माँन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर धडकला असून शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. परंतु, मान्सून बाबत दररोज उलट-सुलट बातम्या तसेच हवामानाचा अंदाज येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. जून महिन्यात पावसामध्ये खंड पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याहीवर्षी दुबार पेरणीचे संकट ओढवणार का? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची खरी भिस्त खरीपावर अवलंबून असते. मान्सून वेळेत दाखल झाला तर शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. परंतु, मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मान्सूनबाबत दररोज उलट-सुलट बातम्या तसेच हवामान खात्याचा अंदाज जाहीर होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे. परंतु, जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडण्याची शक्यता आहे.

पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार १० जूनपासून पाऊस वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीएवढा व समाधानकारक पाऊस राहणार असून सामान्य किंवा सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. परंतु, जून महिन्यात पावसात खंड पडणार असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्याच्या मनात धडकी भरली आहे. याहीवर्षी दुबार पेरणीचे संकट तर निर्माण होणार नाही ना? पेरणी कधी करावी, पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट होईल अशी शंका खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये येत आहे.

शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही

हवामान विभागाने यावर्षी महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०३ टक्के पर्जन्यमान होणार आहे. दरम्यान मोसमी पावसाचा मुख्य प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य भारतात जिथे शेती मुख्य ते पावसावर अवलंबून आहे. तेथे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यात महाराष्ट्राचा काही भाग येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.