नांदेड : उमरी तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात यश; पालकांचे समुपदेशन

balvivah
balvivah
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यात दोन सख्ख्या बहिणीचे बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष व नांदेड चाईल्ड लाईन- १०९८ यांच्या समन्वयातून मंगळवारी (ता. १६) थांबविण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी पालकांचे समुपदेशन करुन बालविवाहानंतर मुलीच्या आयुष्यात किती अडचणी येतात याचे मार्गदर्शन केले. 

मंगळवारी (ता. १६) पार पडणाऱ्या बालविवाहासाठी एक बालिकेचे केवळ १३ वर्षे सहा महिने तर तिची बहिण सतरा वर्षे पाच महिने वयाची असल्याचे निदर्शनास आले. हा बालविवाह मंगळवार रोजी होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या दुरध्वनी सेवेला प्राप्त झाला. यानंतर या संदेशाची पडताळणी करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे आणि चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक बालाजी आल्लेवार आणि संगिता कांबळे यांनी बाल कल्याण समितीच्या सदस्या अॅड. सावित्री जोशी यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून दिली. 

जिल्हाधिकारी डाॅ विपीन आणि अॅड. सावित्री जोशी यांच्या आदेशावरुन

जिल्हाधिकारी डाॅ विपीन आणि श्रीमती सावित्री जोशी यांच्या आदेशावरुन तत्परतेने हे दोन्ही बालविवाह थांबविण्यात येऊन बालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी विद्या आळणे व चाईल्ड लाईनचे पथक यांनी बालविवाह होणारे ठिकाण गाठले. लग्न काही तासावर आले असता त्यांनी दोन्ही मुलींच्या पालकांची भेट घेतली. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून तो बालविवाह करु नका असे सांगितले. त्यानंतर कायद्याच्या चकटीतील अडचणी व भविष्यात मुलीच्या आरोग्याशी येणाऱ्या समस्या याबाबत पालकांचे व मुलींचे समुपदेशन केले. 

लहान वयात मुलीचे लग्न करु नका- विद्या आळणे

पालक व अन्य नातेवाईकांनी हा बालविवाह करणार नाही असे आश्वासन दिले. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृतीचे कार्य चालू असताना देखील असे बालविवाह सर्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. चिमुरड्या मुलींचे शिक्षणाचे व खेळण्या- बागडण्याच्या वयात असताना स्वतः पालकच मुलींचे बालविवाह लावून देत आहेत व बालिकेच्या सर्वांगीण विकासाला बाधा येत आहे. असे बालविवाह होत असल्यास महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अथवा चाईल्ड लाईन १०९८ या हेल्पलाईनवर समस्यांची नोंद करावी व संपर्क साधावा असे आवाहन विद्या आळणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.