नांदेड : वाजेगावला हजारो लिटर बायोडिझेल जप्त

नांदेड ग्रामीणच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांनी पकडला बनावट पंप
Nanded Thousands of liters Biodiesel seized
Nanded Thousands of liters Biodiesel seizedsakal
Updated on

नांदेड : ग्रामीण पोलिस (Gramin Police) ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता.२०) बायोडिझेलचा (Biodiesel) बनावट पेट्रोलपंप पकडला. पोलिसांच्या वाजेगाव चौकीपासून हाकेच्या अंतरावर केलेल्या कारवाईत हजारो लिटर बायोडिझेल जप्त केले. यामुळे नांदेड (Nanded) ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची चालती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Nanded Thousands of liters Biodiesel seized
नाशिक रोड विभागात उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद

बनावट बायोडिझेल माफियांविरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कारवाईच्या सूचना यापूर्वीच पोलिसांना दिल्या होत्या. या मुळे पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई केली. मात्र, आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव पोलिस चोकीच्या मागे असलेल्या अळणी बुवा मठाजवळ एका शटरमध्ये चालणाऱ्या बनावट बायोडिझेल पंपावर धाड टाकली. लगेच पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनाही बोलावून घेतले. तेव्हा केलेल्या तपासणीत एका मोठ्या शटरमध्ये तीन मोठ्या प्लॅस्टीक टाकी सापडली. या टाक्यांना पेट्रोलपंपमध्ये असतात तसे पाईप जोडलेले होते. या पाईपांना वापरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार जोडलेली दिसून आली.

Nanded Thousands of liters Biodiesel seized
औरंगाबाद : विनामास्क वाहन नको रे बाबा...!

यासोबत त्या ठिकाणी रिकामा झालेला एक बायोडिझेल टॅंकरसुद्धा होता. या अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना घटनास्थळी बोलावून कानउघडणी केली. या कारवाईत हजारो लिटर बायोडिझेल आणि शटरमधील सर्व साहित्य तसेच रिकामा झालेला एक टॅंकर व येथे सापडलेल्या तीन जणांना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.