लोहा ( जिल्हा नांदेड ) : धानोरा मक्ता येथे गावातील युवकांना गाव परिसरात एक काळवीट जखमी अवस्थेत आढळून आले. युवकांनी व वनरक्षक एल. एन. शेळके, वनसेवक शेवडीकर यांनी क्षणाचाही विचार न करता, डाॅ.आर. एम. पुरी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना सोनखेड यांना काळवीटवर उपचार करण्यासाठी फोन केला. लोहा पशुवैद्यकीय दवाखान्यात सुट्टीच्या दिवशी काळवीटावर, डॉ. आर. एम. पुरी यांनी जखमी अवस्थेतील काळवीटावर पायाची शस्त्रक्रिया केली.
जखमी मादी काळवीटाच्या उजव्या पायाचे हाड मोडले होते. काळवीट चार ते पाच दिवसापासून वेदना सहन करत विव्हळत पडला होता. धानोरा मक्ता येथील युवकांनी वनरक्षक शेळके यांना संपर्क करुन पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना लोहा येथे आणले. प्राथमिकदृष्ट्या जखम पाहून डॉ. आर. एम. पुरी यांनी पूर्णपणे निकामी झालेले हाड व जखम शस्त्रक्रिया करून काढण्याचे ठरविले. शस्त्रक्रिया करण्यात आली. हे शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काळवीट वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी एस. आर. क्यादरवाड, वनरक्षक एल. एन. शेळके, वनसेवक शेवडीकर यांच्या स्वाधीन करण्यात आले. व पुढील निरीक्षण व उपचारासाठी अर्धापूर येथे काळवीट ठेवण्याची व्यवस्था केली. काळविटाचे प्राण वाचविण्यासाठी व उपचारासाठी धानोरा मक्ता येथील पोलिस पाटील राम कोंपलवार, मारुती गायकर, अमोल गायकर, लक्ष्मण कदम, गंगाधर पौळ, विजय कदम, रोकडोबा गायकर, सुरेश नागरगोजे, योगेश कदम, धनंजय गायकर, यांनी परिश्रम घेतले.
' सकाळ'ने घेतला पुढाकार
जखमी अवस्थेतील वन्यजीवांना कायमस्वरुपी अभयारण्य मिळावं, शिवाय घटनेतील अवस्थेतील हरीण, ससा, नीलगाय यासारख्या प्राण्यांसाठी तालुकावार वन्यजीव रक्षक संघ सकाळ ने तयार केले आहेत. लोहा तालुक्यातील पेनुर, बेट सांगवी, सोनखेड, धानोरा मक्ता, सायाळ, पांगरी या ठिकाणी वन्यजीव रक्षक संघ तयार करण्यात आले आहेत. या परिसरात जखमी अवस्थेतील वन्यजीवांना वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने व वन्यजीव चिकित्सक, विभाग यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तशी सोय करण्यात आली आहे. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांनी पिक रक्षणासाठी पिका बाहेरील तारेमध्ये वीजप्रवाह सोडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.