नांदेड : नाबार्ड अंतर्गत सगरोळीत शेळीपालन प्रशिक्षण

आठ तालुक्यांतील ५० शेतकऱ्यांची उपस्थिती: कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम
Nanded Under NABARD Goat
Nanded Under NABARD Goatsakal
Updated on

सगरोळी : वातावरण बदलाचे कृषी क्षेत्रावर होणारे अनिष्ठ परिणाम लक्षात घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे, जे तरुण या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, या उद्देशाने नाबार्डच्या साहाय्याने सगरोळी (ता.बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या उत्कर्ष लर्निंग सेंटरतर्फे नुकतेच शास्त्रोक्त पद्धतीने ‘शेळी पालन प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठ तालुक्यातील ५० शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.

Nanded Under NABARD Goat
12 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाला मोठं यश

नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठचे संचालक, कृषि विस्तार प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी शास्त्रोक्त शेळीपालनातील चतुःसूत्री बद्दल शेतकऱ्यांना माहिती देताना, शेळी पालन म्हणजे शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड असून कोणत्याही क्षणी पैसा उपलब्ध होतो असे सांगितले.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापाक राजेश धुर्वे यांनी शेळीपालन प्रशिक्षणाचे महत्व विशद करून विपणन व्यवस्थापन व बँकेच्या बाबतीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.नितीन मार्कंडेय यांनी प्रजनन व्यवस्थापना विषयी विशेष मार्गदर्शन केले.

Nanded Under NABARD Goat
भारत-इस्राईल सहकार्याचे विकासगाथेत मोठे योगदान

शल्य चिकित्सक व क्ष किरण शास्त्र तज्ञ डॉ.गजानन ढगे यांनी शेळ्यांचे आजार, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सादरीकरण केले. आटपाडी येथील शेळी तज्ञ प्रसाद देशपांडे, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विनायक इंगळे, डॉ.एम. बी. ए. सिद्दिकी, डॉ.सुहास अमृतकर यांनी संगोपन पद्धती, गोठ्याचे व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, शेळी पालनाचे अर्थशास्त्र या विषयी सविस्तर मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली तर पशुधन विकास अधिकारी डॉ.शिरीष गळाकाटू यांनी शेळीपालनाच्या शासकीय योजनांविषयी शेतकऱ्यांना अवगत केले. या प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या बंदिस्त शेळीपालन प्रकल्पासह. रोषनगाव (ता.धर्माबाद) येथील साईनाथ शिवशेट्टे व टाकळी वझिरगाव (ता. नायगाव) येथील डॉ.अशोक मोरे यांच्या शेळीपालन प्रकल्पांस भेट दिली. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी दैनंदिन व्यवस्थापनातील त्रूटी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()