Nanded News : नांदेड जिल्ह्यात गारांचा मारा; वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही, रब्बीला तडाखा

हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड आणि किनवट तालुक्यांना रविवारी वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
nanded unseasonal heavy rain crop damage farmers agriculture
nanded unseasonal heavy rain crop damage farmers agricultureSakal
Updated on

Nanded News : जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड आणि किनवट तालुक्यांना रविवारी वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी आंब्याचा मोहोर गळाला आहे.

जिल्ह्यातील काही भागांत आज रविवारी (ता. ११) दुपारी वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात ढगांनी गर्दी केली आणि काही वेळेतच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

जिल्हा प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील कळगाव, ईश्वर तांडा, सोमठाणा, हिमायतनगर तालुक्यातील खडकी, टेंभी घारापूर, जवळगाव, पोटा, कामारी, वइरसनई, सरसम, मांडली, आंदेगाव, वटफळई, दुधड, सिरंजनी,

धानोरा आणि किनवट तालुक्यांतील धामणदरी या गावांमध्ये गारपीट झाली झाली आहे. शिवणी (ता. किनवट) येथेही विजांच्या कडकडाटासह सायंकाळी रिमझिम पाऊस झाला. हदगाव तालुक्यातील लिंगापूर शिवारात वादळी वाऱ्यासह दहा मिनिटे गारपीट झाली.

वादळी वाऱ्यामुळे गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी आशिष देवसरकर यांनी केली आहे.

भोकरमध्ये नुकसान

भोकर तालुक्यात दुपारी वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीट झाली. अचानक थंडीचा जोर ओसरून अवकाळी पावसाने झोडपल्याने ज्वारीचे पीक आडवे झाले. आंबाचा मोहोर गळून पडला आहे.

काढणीला आलेली ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. हरभरा, गहू पिकांना फटका बसला आहे. शहरासह तालुक्यातील हाडोळी, मोघाळी, किनी, कामनगाव, थेरबन आदी भागांत हा अवकाळी पाऊस झाला. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता.

हिमायतनगरला झोडपले

हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी चारच्या सुमारास ढगांनी आकाश व्यापले. क्षणार्धात जोरदार वारा, गारांसह पावसाला सुरवात झाली.

ठिकठिकाणी गारांचा खच पडला होता. अचानक झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीसह रब्बीतील गहू, हरभरा व अन्य पिकांसह आंब्याला तडाखा बसला. उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.

वीज पडून तरुणाचा मृत्यू

अंगावर वीज पडून चोर पिंपळकौठा (ता. मुदखेड) येथील दत्ता दिगंबर वाघमारे (वय २२) याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने दिली. रविवरी दुपाची चार ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.