नांदेड : नांदेडमधील एका तरुणाने आपल्या पुतण्यासाठी ऑनलाईन कपडे मागवले होते. कपडे कोलकाता (Kolkata) येथून येणार होते. कपड्याचे पार्सलही मिळाले. मात्र पार्सलवरील पत्ता सोशल मीडियावर व्हायरला झाला आणि एकच खळबळ उडाली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. शेख खलील (रा.देगलूर नाका परिसर) असे ऑनलाईन कपडे मागवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत सदरील प्रकार गैरसमजूतीतून घडल्याचे समोर आले आहे. (Nanded Viral Address News Police Clarify Truth Behind Viral)
खलील हा निरक्षर आहे. त्याने मोबाईलमधून व्हाॅईस रेकाॅर्ड करुन संबंधित कंपनीला त्याचा पत्ता पाठविला होता. कंपनीने खलीलच्या नावाखाली पाकिजानगर लिहिण्याऐवजी पाकिस्तान नगर, नांदेड (Nanded), असा पत्ता लिहिला. शहरासह जिल्ह्यात पाकिस्तान नगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरात पाकिजानगर आहे.
सदरील प्रकार गैरसमजूतीतून झाल्याचे इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धबडगे यांनी सांगितले आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकू नये. जर कोणी तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे धबडगे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.