नांदेड : विद्यार्थ्यास चाकूचा धाक दाखवून लुटले

विद्यार्थ्यांनी केले आंदोलन; विष्णुपुरीत वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटना
Nanded Vishnupur Medical College fraud Agitation by students
Nanded Vishnupur Medical College fraud Agitation by studentsSakal
Updated on

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शनिवारी परीक्षा शुल्क भरण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यांस अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोरुन ग्रंथालयाच्या पाठीमागील पडीत भागात ओढून नेऊन चाकुचा धाक दाखवत त्यांच्याकडील आठ हजार रुपये लुटल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केले आहे.

परीक्षा शुल्क भरण्याचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आदित्य नावाचा विद्यार्थी ग्रंथालय व अधिष्ठाता यांच्या मुख्य इमारतीसमोरुन जात होता. त्यावेळी डोक्यावर रुमाल बांधलेली एक अनोळखी व्यक्ती अचानक आदित्यसमोर आली आणि आमचा माणूस बेशुद्ध पडला आहे.

तुम्ही चला असे म्हणत त्यास ग्रंथालयाच्या पाठीमागील पडीत जागेत घेऊन गेली. त्यानंतर त्याच्या गळ्यावर चाकू ठेऊन तुझ्याकडील सर्व पैसे दे, अन्यथा तुला ठार मारतो, अशी धमकी दिल्याने आदित्यची घाबरून जाऊन बोलती बंद झाली. इतकेच नव्हे, तर संबंधित व्यक्तीने तुझा चेहरा चांगल्या प्रकारे बघितला आहे. कोणाला काही सांगितले तर तुला संपवून टाकील, अशी धमकी देत त्यांच्या बॅगेतील परीक्षा शुल्क भरण्यासाठीचे आठ हजार रुपये व त्याच्याकडील मोबाईल घेऊन चोर पसार झाला.

यापूर्वी देखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली असून, त्यांच्या मनात असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केले.

सुरक्षा रक्षक असतात तरी कुठे?

रुग्णालयाच्या मुख्य गेटपासून ते प्रत्येक वार्ड, प्रशाकीय कार्यालय, ग्रंथालय, वसतीगृह अशा सर्वच ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतू अनेक वेळा सुरक्षारक्षक मोबाईल बघण्यात गुंग होतात की त्यांना त्यांच्या कर्तव्याचा देखील विसर पडतो. यापूर्वी देखील सुरक्षा रक्षकातील आपसातील मतभेदामुळे व महिलांशी गैरवर्तन केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकास नेमुन दिलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर राहतात का? हा देखील प्रश्न असून, त्यांच्या हलगर्जीमुळेच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये चोरी, लुटमारीचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.