Naned News : कर वसुलीसाठी नांदेड वाघाळा महापालिका आक्रमक

सहा पथकाद्वारे कार्यवाही सुरू; थकबाकीदारांचे दुकान जप्तीसोबत नळ, ड्रेनेज खंडित
Nanded Waghala Municipal Corporation aggressive for tax collection
Nanded Waghala Municipal Corporation aggressive for tax collectionsakal
Updated on

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने थकीत कर वसुलीसाठी सहा पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येत असून शुक्रवारी (ता. १३) मालमत्ताधारकांनी कर भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे दुकान जप्त करण्यात आले तसेच ड्रेनेज खंडीत करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कर वसुली करण्यासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सहा पथके तैनात केली आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीची मोहिम सुरू आहे. शुक्रवारी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार वजीराबाद अंतर्गत मालमत्ताधारकाकडे चार लाख ६१ हजार कर थकीत होता.

त्याने भरणा करण्यास नकार दिल्याने एक दुकान सील, एक ड्रेनेज लाईन बंद करण्यात आली. गोवर्धन घाट येथील मालमत्ताधारकाकडे एक लाख ४६ हजार थकबाकी होती. त्याने कर भरण्यास नकार दिल्याने ड्रेनेज बंद करण्यात आले. सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्यासह पथकातील अझहर अली, रमेश वाघमारे, गिरीश काठीकर, महेंद्र नांगरे, दीपक जोंधळे, जयप्रकाश हाटकर, शकील अहमद यांनी ही कार्यवाही केली.

इतवारा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक पाच अंतर्गत एकाकडे एक लाख रुपये कर थकीत असल्याने व त्याने भरणा करण्यास नकार दिल्याने ड्रेनेज लाईन बंद करण्यात आली. तसेच एकाकडे एक लाख ८१ मालमत्ता कर थकीत असल्याने व त्याने भरण्यास नकार दिल्याने त्याचे एक दुकान सील करण्यात आले. दुसऱ्या एका मालमत्ताधारकाकडे एक लाख ४३ हजाराचा कर थकीत होता व त्याने भरण्यास नकार दिल्याने त्याचे‌ ड्रेनेज खंडीत करण्यात आले. सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे यांच्यासह पथकातील जी. जी. तोटावार, सय्यद हबीब, गुलाम दस्तगीर, राजेश एडके, शुभम वाघमारे, शेख फारूख यांनी कार्यवाही पार पाडली.

महापालिका हद्दीत शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी अजूनही आपला थकीत व चालू कराचा भरणा केला नाही. याबाबत संबंधित मालमत्ताधारकांना मागणी नोटीसा दिल्या आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. जे मालमत्ताधारक कराचा भरणा करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध कार्यवाही सुरूच राहणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला थकीत व चालू कर भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, नांदेड वाघाळा महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.