Nanded : मनोज जरांगे यांच्या जिल्ह्यात चार ठिकाणी सभा

आठ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी आयोजन : मुख्य सभा १११ एकर जागेवर
Manoj jarange patil
Manoj jarange patilsakal
Updated on

नवीन नांदेड : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेले आंदोलन राज्यभरात अधिक जोमाने चालू असताना (ता.आठ) डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात एकूण चार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिजाऊ नगर येथील सभेपासून आपल्या दिवसाची सुरुवात करत अनुक्रमे मारतळा, नायगाव आणि कंधार येथील सभेला संबोधित करणार आहेत. अशी माहिती सकल मराठा समाज, नांदेडच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. नांदेड जिजाऊनगर वाडिपाटी येथे मातोश्री कॉलेजच्या पाठीमागील कल्हाळ येथिल तब्बल १११ एकरचे मैदान निवडले असून सदरील मैदानावर नांदेड शहरासह ग्रामीण भागातील लाखो समाज बांधव या सभेला येणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आले.

Manoj jarange patil
Nanded News : स्वच्छता, सुरक्षिततेबाबत तडजोड नकोच - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

विवध समिती करणार नियोजन

या सभेचे नियोजन सुद्धा अतिशय शिस्तबद्ध चालु असून जवळपास १९ समित्या नेमण्यात आल्या आहेत. वैद्यकीय समिती, अन्न वाटप समिती, पाणी वाटप समिती, पार्किंग व्यवस्थापन समिती, स्टेज व्यवस्थापन समिती, मराठा सेवक समिती, प्रचार-प्रसार माध्यम समिती, कायदेशीर कागदपत्रे पुरवठा समिती यासह विविध समित्या बनवून आप आपल्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.