तामसा (जि.नांदेड) : अभियंता रवंदे दांम्पत्य प्रेक्षणीय, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती यु ट्युबवर सादर करण्याचा अनोखा छंद जपत आहे.
तामसा (जि.नांदेड) : अभियंता रवंदे दांम्पत्य प्रेक्षणीय, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती यु ट्युबवर सादर करण्याचा अनोखा छंद जपत आहे. सकाळ

कोविडमुळे नवीन छंद! अभियंता दाम्पत्याची भ्रमंतीला सुरुवात

Published on

तामसा (जि.नांदेड) : अभियंते म्हणून मुंबई येथे वास्तव्याला असलेले पण कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) वर्क फ्रॉर्म होममधून काम करत सुटीचा सदुपयोग करत रवंदे दाम्पत्य ऐतिहासिक, प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देत चित्रीकरण करण्याचा छंद जोपासत आहे. मूळ हदगाव तालुक्यातील तामसा गावची रहिवासी असलेली अंकिता रवंदे (वाटेगावकर) या पती श्रीविधी यांच्यासह नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli) आदी जिल्ह्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक, प्रेक्षणीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यातील बारीक - सारीक माहितीचे प्रभावी व वस्तुनिष्ठ विश्लेषण यू ट्यूबच्या (Youtube) माध्यमातून सादर करण्याचा अनोखा छंद जोपासत आहेत. मुळात भ्रमंतीची आवड असणाऱ्या या दाम्पत्यांने नुकतेच शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे तंतोतंत पालन करीत हदगाव (Hadgaon) तालुक्यातील तीर्थक्षेत्र केदारनाथ येथील हेमाडपंथी शिवमंदिर व सहस्रकुंडच्या धबधब्याचे (Sahastrakund Water Fall) सुटीच्या दिवशी चित्रीकरण केले आहे. या शिवाय नांदेड परिसरातील काळेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथे असलेले केशवराज मंदिर आदी प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांचे चित्रीकरण करून माहितीपर वर्णन यु ट्युबवर सादर केले आहे.

तामसा (जि.नांदेड) : अभियंता रवंदे दांम्पत्य प्रेक्षणीय, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती यु ट्युबवर सादर करण्याचा अनोखा छंद जपत आहे.
नांदेडमधून किसान रेल्वे सुसाट! मिळाला ४२ कोटींचा महसूल

धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची व निसर्ग सौंदर्याच्या विविध छटा दाखवत पर्यटनाचा अभूतपूर्व आनंद देणाऱ्या ठिकाणांची ऐतिहासिक संदर्भ व अख्यायिका यांच्याद्वारे माहिती यु ट्यूब वर प्रसारित केली जाते. मुंबईसारख्या धावपळीच्या व दगदगीच्या महानगरातून कोरोनामुळे घरी बसून जॉब करावा लागत आहे. रवंदे दाम्पत्याला कोविडमुळेच आपल्यातील 'भ्रमंती'च्या आवडीला अभिव्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. केदारनाथ मंदिराचा परिसर, जंगल, विविध वृक्षांनी नटलेली निसर्ग समृद्धी, मंदिराचा इतिहास, त्यातील विधीपद्धत, रितीरिवाज आदींची चित्रीकरणाससह अप्रतिम वर्णन रवंदे दांपत्याने केले आहे. सहस्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप, त्यातील सौंदर्य, परिसरातील ऐतिहासिक संदर्भ यांचे अचूक विश्लेषणात्मक वर्णन झाले आहे. या ठिकाणांना भेट देऊ पाहणाऱ्या पर्यटक व भक्तांना रवंदे दांपत्याचा यु ट्युबवरील माहितीपट उपयुक्त व मार्गदर्शक ठरणारा आहे.

तामसा (जि.नांदेड) : अभियंता रवंदे दांम्पत्य प्रेक्षणीय, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती यु ट्युबवर सादर करण्याचा अनोखा छंद जपत आहे.
समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

स्वतः प्रवास वर्णनाचा आनंद घेत विविध ठिकाणांची माहिती नागरिकांना देण्याचा हेतू या निमित्ताने साध्य करण्याचा प्रयत्न हे दांम्पत्य उत्साहाने करत आहे. भ्रमंतीच्या निमित्ताने येणारे विविध अनुभव, माहिती घेताना नागरिकांच्या प्रतिसादातील विविध बारकावे, ठिकाणांच्या बाबतीतील दडलेली माहिती शोधून काढण्याचा प्रयत्न व या निमित्ताने येणारे अविस्मरणीय अन् आनंददायी अनुभव याची शिदोरी जीवनरूपी आयुष्याचा गोडवा व महत्व वाढविणारी असल्याचे समाधान रवंदे दाम्पत्याला मिळत आहे.

तामसा (जि.नांदेड) : अभियंता रवंदे दांम्पत्य प्रेक्षणीय, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती यु ट्युबवर सादर करण्याचा अनोखा छंद जपत आहे.
'जनआंदोलन उभारून मोदी सरकारला ओबीसी जणगणना करण्यास भाग पाडू'

माझे माहेर तामसा हे भाजी - भाकरी पंगत व शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेल्या नेताजी पालकर यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. कामातून सुटीचा दिवस सत्कारणी गेल्याचे आनंददायी समाधान या निमित्ताने वाटते. माहितीचे विश्लेषणात्मक सादरीकरण करताना मराठी भाषेच्या गोडव्याची अनुभूती जाणवते. पतीसह सासर व माहेरचे सहकार्य अन् संबंधित ठिकाणच्या नागरिकांची मदत यामुळे भ्रमंतीचा हेतू साध्य होणार आहे.

- अंकिता श्रीविधी रवंदे, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.