नांदेड : एक कोटीपर्यंत निधी संकलनाचा निर्धार

सशस्त्र सेना ध्वजदिनी शुभारंभ; वीरनारी, वीरपितांचा गौरव
नांदेड : एक कोटीपर्यंत निधी संकलनाचा निर्धार
नांदेड : एक कोटीपर्यंत निधी संकलनाचा निर्धारsakal
Updated on

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२१ - २०२२ च्या संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. या वर्षी जिल्ह्याला निधी संकलनाचे ४५ लाख ३० हजार एवढे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट एक कोटीपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार तसेच विशेष गौरव पुरस्कारांच्या २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

निधी संकलनाचा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर - घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत निधी संकलनाची सुरुवात झाली.

नांदेड : एक कोटीपर्यंत निधी संकलनाचा निर्धार
अकोला : १२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन, महिलांसाठी बचतगट व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेडला सुरु करण्याबाबतची विनंती केली.

संकलनात ज्या शासकीय कार्यालयाने, शाळा तथा महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. त्र्यंबक मगरे यांनी सुत्रसंचालन केले तर कल्याण संघटक अर्जुन जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, बालाजी चुगुलवार, प्रकाश कस्तुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयाचे बुधसिंग शिसोदे, बालाजी भेारगे, सुर्यकांत कदम, गंगाधर हटकर आदींनी प्रयत्न केले.

नांदेड : एक कोटीपर्यंत निधी संकलनाचा निर्धार
अकोला विधानपरिषद : भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीला धक्का

निधी संकलनाबद्दल नांदेडचा गौरव

वर्ष २०२०-२१ साठी शासनाने जिल्ह्याला ३५ लाख ५० हजार एवढे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने ८५ लाख २७ हजार ९७१ निधी जमा करुन २४१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तसेच वर्ष २०२१ - २२ साठी शासनाकडून ४५ लाख ३० हजार एवढे उद्दिष्ट मिळालेले असून ते जिल्ह्याने एक कोटीपर्यंत निधी जमा करुन पूर्ण करण्याचे निर्धारीत करण्यात येईल, असे श्रीमती मोतीयेळे यांनी नमुद केले. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन निधी शासनास जमा केल्याबद्वल शासनाने जिल्ह्याचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.