Nanded Rain News : पनवेल, पुणे, पंढरपूर एक्स्प्रेस रद्द; दौंड स्थानकावर ट्रॅफिकमुळे निझामाबाद-पुणे गाडीच्या मार्गात बदल

Nanded Rain Railway Latest news in marathi |मध्य रेल्वेवरील दौंड रेल्वे स्थानकावर ट्राफिक आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दौंड रेल्वे स्थानकावर ट्राफिकमुळे नांदेड-पनवेल, पुणे, पंढरपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या.
Panvel Pune Pandharpur Express cancelled Change in route of Nizamabad-Pune train due to traffic at Daund station
Panvel Pune Pandharpur Express cancelled Sakal
Updated on

Nanded : मध्य रेल्वेवरील दौंड रेल्वे स्थानकावर ट्राफिक आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दौंड रेल्वे स्थानकावर ट्राफिकमुळे नांदेड-पनवेल, पुणे, पंढरपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत तर निझामाबाद-पुणे गाडीच्या मार्गात बदलण्यात आला आहे.

२९ जुलै ते एक ऑगस्टपर्यंत नांदेड-पनवेल एक्स्प्रेस (१७६१४), २८ ते ३१ जुलैपर्यंत पनवेल - नांदेड एक्स्प्रेस(१७६१३), २९ जुलै ते एक ऑगस्टपर्यंत दौंड-निझामाबाद एक्स्प्रेस(११४०९) , ३१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत निझामाबाद-पुणे एक्स्प्रेस (११४१०) ,

३१ जुलैला नांदेड-पुणे एक्स्प्रेस (१७६२९) , एक ते दोन ऑगस्टपर्यंत निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस (०१४१३),पंढरपूर-निझामाबाद एक्स्प्रेस (०१४१४)२ ते ३ ऑगस्टपर्यंत रदद करण्यात आली आहे. तसेच निझामाबाद-पुणे(११४१०) २८ ते ३१ जुलै दरम्यान, दौंड कोर्ड लाईन मार्गे धावेल, असे कळविले आहे.

Panvel Pune Pandharpur Express cancelled Change in route of Nizamabad-Pune train due to traffic at Daund station
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवन विस्कळित; सखल भागात साचले पाणी

नांदेडमध्ये होतोय रेल्वे गाड्यांना विलंब

नांदेड रेल्वेस्थानकावर २३ जुलैला पनवेल २ तासांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभी केली होती. तसेच मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ४० मि.पासून उभी होती. जिची निघायची वेळ सकाळी ९ वाजता आहे. या दोन्ही गाड्या विनाकारण स्थानकावर उभ्या होत्या. यामुळे देवगिरी एक्सप्रेस ५० मि.पासून वानेगाव येथे उभी केली होती.

ती नांदेडमध्ये सव्वा दहा वाजता आली. हे केवळ प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे वारंवार अशी परिस्थ‍िती निर्माण होते. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दक्षिण- मध्य रेल्वे विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले असले तरी, मुलभुत सोयी, सुविधांबाबत मात्र, आजूनही उदासिनता असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.