नांदेड : कोवीड- १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा (Oxygen suplay) मुबलक करण्यासाठी नांदेडमध्ये दोन आॅक्सीजन प्लांट पी.एम.केअर फंडातून (Pm Care fund) मंजूर झाले असून त्यातील एका प्लांटचे कामही सुरु झाले आहे. त्यापैकी गुरुगोविंदसिंघ शासकीय रुग्णालयातील आॅक्सीजन प्लांट ३० मेपर्यंत तर डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी येथील प्लांट ३० जूनपर्यंत सुरु होईल, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Mp chikhalikar) यांनी सोमवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली. (P.M.- Two- Oxygen- Plants- to- Nanded- from- Care- Fund-MP -Chikhlikar)
खासदार चिखलीकर म्हणाले की, केंद्रातर्फे १० मे रोजी पहिली आॅर्डर काढली. त्यात देशामध्ये ७२ प्लांटचा समावेश असून राज्यात नांदेड, पुणे, औरंगाबाद आणि जालना अशा चार प्लांटचा समावेश होता. तसेच २२ मे रोजीच्या आॅर्डरमध्ये देशात २०० प्लांट असून राज्यात १० प्लांटचा समावेश आहे. त्यात नांदेडचा समावेश असून विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये हा आॅक्सीजन प्लांट उभा राहणार आहे. गुरुगोविंदसिंघ शासकीय रुग्णालयातील प्लांटचे काम युद्ध पातळीवर सुरु असून सोमवारी मी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, नॅशनल हायवेचे अधिकरी सुनिल पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. यादवराव चव्हाण यांच्या सोबत पाहणी केली आहे. विष्णुपुरी येथे प्लांट उभारणीसाठीच्या जागेचीही पाहणी केल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाची होतेय मदत
आॅक्सीजन प्लांटचे काम युध्द पातळीवर पुर्ण होण्यासाठी केंद्र सरकार विविध मंत्रालयाची मदत होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सिव्हील वर्कची जबाबदारी घेतली आहे. तर संरक्षण मंत्रालयाच्या सैनिकी हेलीकॉप्टरमधुन सदर प्लांटची मशीनरी नांदेड येथे आणण्याची जबाबदारी घेतली. महावितरनकडून विजपुरवठा केला जाणार आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने ‘डीआरडीओ’ची जाबबदारी स्विकारली आहे. एका प्लॉटची क्षमता एक हजार (LPM) लिटर प्रतिमिनिट असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.