पोलिसांचे सर्च आॅपरेशन मिशन : गंभीर गुन्ह्यातील नांदेडच्या सव्वाशे गुन्हेगारांना लवकरच करणार अटक- प्रमोद शेवाळे

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, जबरी चोरी, घरफोडी, अत्याचार आणि विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हे करुन गुन्हेगार हा शेजारील राज्यात किंवा परजिल्ह्यात आश्रय घेतात. मात्र त्यांची ओढ गावाकडे येताच पोलिस यंत्रणेकडून मुसक्या आवळल्या जातात. मात्र काही गुन्हेगार शातीर असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अशा गंभीर गुन्ह्यातील जवळपास सव्वाशे गुन्हेगार मोकाट आहेत. त्यांना सर्च आॅपरेशनच्या माधयमातून लवकरच जेरबंद करु असा विश्वास पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील जवळपास सव्वाशे आरोपी पोलिसांच्या दप्तरी पाहिजे (वांटेड) असताना मोकाट आहेत. यात काही जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून ते सध्या राज्याच्या विविध कारागृहात शासकीय पाहुणचार घेत आहेत. गेल्या वर्षभरात नांदेड शहर व जिल्ह्यात खंडणीसाठी गोळीबार किंवा अपवाद वगळता हायप्रोफाईल गुन्हेगारीच्या घटना घडल्या नाहीत. परंतु चोरी, दरोडा यासह इतर खुनाच्या घटनातील जवळपास १२५ आरोपी मोस्ट वॉन्टेड आहेत. यामध्ये काही कुख्यात आरोपींचा सहभाग आहे.

एक हजार १५४ गुन्हेगारांची पोलिस दप्तरी नोंद 

जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात एक हजार १५४ गुन्हेगारांची पोलिस दप्तरी नोंद असून ते पोलिसांना पाहिजे असलेल्या सदरात मोडतात. पोलिसांकडून या गुन्हेगारांचे नातेवाईक, मित्र यांच्यावर नेहमी करडी नजर असते. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार काही दिवस पळून जातात. परंतु गावाच्या ओढीने ते परत आल्यानंतर झीरो पोलिसांकडून माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा त्यांच्या मुसक्या आवळते. वर्षानुवर्षांपासून फरार असे अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु अद्यापही काही अट्टल आरोपी पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी दुसऱ्या राज्यात पळून जातात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड होत आहे.

बालगुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी

अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याने पोलिस यंत्रणेचे हात बांधल्या जात आहेत. याचा फायदा सराईत गुन्हेगार घेत अशून अनेक अट्टल गुन्हेगारंनी अल्पवयीन युवकांना गुन्हेगारीकडे ओढत आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसात अनेक गुन्ह्यात अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी पोलिसांच्या दप्तरी जरी नसले तरी त्यांच्याकडून मोठ्या घटनांना आकार देण्यात येत आहे. बालगुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट 

शहरातील दत्तनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर तो मारेकरी अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिस एकडुटीने काम करत अशले तरी त्याचा शोध अद्याप लागला नाही. त्यातच नांदेड व शेजारील परभणी जिल्ह्यात हैदोस घातलेला कुख्यात रिंदा यालाही अटक झाली नाही. त्याचा आधार घएत नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढली ह होती. मात्र वेळीच पोलिस पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे व विजय कबाडे यांनी लक्ष घालून या टोळीवर मोक्का लावला. त्या टोळीतील जवळपास ५० हुन अधिक आरोपींना पकडण्यात आले आहे. ते सर्वजण सध्या विविध कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. 

लवकरच सर्च आॅपरेशन मोहिम फत्ते करणार

शहरातील अनेक उद्योगपती, डॉक्टर, व्यापारी यांना खंडणीसाठी धमक्या येत होत्या. त्यातून काही जणांवर तर गोळीबार करुन जखमी केले होते. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात टोळीयुद्ध करणारे अनेकांचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे आता खंडणीसाठी गोळीबाराच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत. चोरी आणि खुनातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून अजूनही काही जण आमच्या रडारवर असल्याचे सांगितले.
- द्वारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.