Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Bhokar Assembly Elections 2024 : भोकर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाल्याने मतदार नाराज आहेत.
Bhokar Assembly Elections 2024
Bhokar Assembly Elections 2024sakal
Updated on

भोकर : तालुक्यातील जनतेच्या मतावर राजकीय मंडळींनी विविध पदे उपभोगली आहेत. हमखास मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणारा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची रेलचेल दिसून येत आहे.

भोकर तालुका विकासाच्या बाबतीत नंबरवन. मात्र, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत वाणवा आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तुमचं बर हाय साहेब...आमची फरफट कवा थांबणार, अशी जनतेची मागणी आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ स्थापनेच्या प्रारंभापासून काँग्रेस पक्षाने पायमुळे घट्ट रोवली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्षांनी ताबा मिळवला होता. मतदारांनी पुन्हा काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिल आहे. ध्यानी मनी नसताना अचानक काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने मतदार अचंबित झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपवर नाराजी व्यक्त करून पुन्हा काँग्रेस पक्षाला संधी दिली. त्यामुळे भाजपला चांगलीच चपराक बसली आहे. अपयशातच खरं यश दडलेले असते, म्हणून पराभवाची तमा न बाळगता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कन्या श्रीजया चव्हाण हिस भाजपने संधी दिल्यास राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविला जाणार आहे.

याच मतदारसंघातून दिवंगत शंकरराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. योगायोगाने त्यांची नात श्रीजया हिची राजकीय वाटचाल याच मतदारसंघातून होणार आहे, हे विशेष. याशिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, बाळासाहेब पाटील रावणगावकर, सुभाष किन्हाळकर, गोविंद बाबा गौड पाटील, पप्पू पाटील कोंढेकर, दामिनी ढगे आणि शिवसेना ठाकरे गटाचे बबन बारसे, शिवसेना शिंदे गटाचे अमोल पवार उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

याशिवाय वंचित बहुजन आघाडी, बीआरएस, एमआयएम पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात गेलेले माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याशिवाय ओबीसी चेहरे असलेले नामदेव आयलवाड, नागनाथ घिसेवाड, बालाजी शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात कोणाला झुकत माप देणार? यावर राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सध्या तरी चित्र स्पष्ट सांगता येत नाही.

मूलभूत गरजा महत्त्वाच्या

तालुक्यातील विकासाच्या बाबतीत चढता आलेख असला तरी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे महत्त्वाच्या आहेत. यात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत ठोस निर्णय घेतला गेला नाही. भविष्यात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन जनतेची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()