बारड : बारड सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असल्या तरी वर्चस्वाच्या लढाईत गटा तटाचे राजकारण पहावयास मिळत आहे. विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गोपाळ बालासाहेब देशमुख तर उपाध्यक्षपदी आत्माराम बालाजी एमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून दोन रिक्त जागेचा तिढा कायम असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अंतिम निर्णयानंतर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता गावकऱ्यांना आहे.
निवडणुकीत दोन्ही गटाने शेवटच्या क्षणापर्यंत तटस्थ भूमिका घेतल्याने एका गटाच्या दोन जागा रिक्तच असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अंतिम निर्णयानंतर जागा भरणार आहेत, दोन्ही गटाच्या तठस्थेच्या भूमिकेमुळे तडजोडीचे प्रकरण मध्यस्थीच्या अंगलट आले आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी नांदेडग्रामपंचायत सभागृहात पार पडली अध्यक्षपदासाठी गोपाळ देशमुख यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी आत्माराम एमले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचितांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रभाकर आठवले तर उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोसायटी अंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे तसेच पारदर्शक कारभारातून संस्थेस उभारणी मिळवून देण्याचा विश्वास गोपाळ देशमुख यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.