नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाकडून सुरु आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार ५२१ शेतकर्यांना १, १५१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी पूर्व संमती देण्यात आली. यापेकी तांंत्रीक तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १, ५२१ शेतकर्यांपेकी सहा शेतकर्यांनी ६. ७ हेक्टरवर फळबागेची लावगड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत खालीलप्रमाणे फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. यात आंबा कलम, आंबा रोपे, चिकू, पेरू,डाळिंब, मोसंबी, संत्रा, लिंबू आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आला आहे. फळपिकांचा समावेश करुन शेतकर्यांच्या मागणी नुसार घनपध्दतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रती हेक्टरी सुधारीत मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे. या पिकांच्या लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्री करीता तिसर्या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.
हेही वाचा - इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या हाफमध्ये डागले दोन गोल
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांना २०२१- २२ मध्ये १, ६९० हेक्टरवर फळबाग लागवडीचे लक्षांक देण्यात आले आहे. यापेकी जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार ५२१ शेतकर्यांना १, १५१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी पूर्व संमती देण्यात आली. यापेकी तांंत्रीक तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १, ५२१ शेतकर्यांपेकी सहा शेतकर्यांनी ६. ७ हेक्टरवर फळबागेची लावगड केली आहे. तर २२ शेतकर्यांनी २१. ७० हेक्टरवर लागवड करण्यासाठी चार हजार ३५१ खड्डे केल्याची माहिती तंत्र अधिकारी श्री स्वामी यांनी दिली. दरम्यान फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी
लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.
वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शासनाने २०१२ मध्ये रोहयो मधून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. फळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषी विभाग हा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित करुन ई मस्टर निर्गमीत करणे, भरणे, पारीत करणे, कुशल-अकुशल बाबींचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी यांना तर प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
येथे क्लिक करा - दुर्दैवाने जिल्ह्यातील २२० महिलांच्या नशिबी कोरोनाने वैधव्य आले
फळबाग लागवडीत अव्वल कृषी सहायकाचा सन्मान
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्ंगत डोंगरगाव (ता. लोहा) सज्जाचे कृषी सहायक आनंदा शिरोळे यांना फळबाग लागवडीमध्ये ३२. १० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राहुरी येथे रविवारी (ता. २७) कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.