नवी दिल्ली : नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ३७ जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या मृत्यूंचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार हे सर्व मृत्यू औषधांअभावी झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Preliminary report of Nanded death case submitted to Centre Imp update given by Bharti Pawar)
पवार म्हणाल्या, सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याची परिस्थिती जाणून घेतली. 500 बेडचे हॉस्पिटल आहे. इथं औषधे आहेत की नाही याबाबत माहिती घेतली. इमर्जन्सी रुग्ण किती आहेत याचा आढावा घेतला, त्यानुसार आज 25 रुग्ण आहेत काल 40 होते. इथं आयसीयूचे 9 बेड होते, ते वाढवण्याची गरज होती. त्यानुसार कोरोनात या रुग्णालयाला पॅकेज देण्यात आलं होतं त्यानंतर ते आता 80 बेडचं होईल. यात काही टेक्निकल अडचणी आहेत. (Latest Marathi News)
या संपूर्ण प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही समिती नेमली आहे. त्यानुसार ही चौकशी सुरु आहे, काही नवजात बाळं या रुग्णालयात होते ते इमर्जन्सी व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं. समिती तर संपूर्ण अहवाल देईलच पण प्राथमिक अहवालानुसार, त्यामध्ये विशेषकरुन पुरेसी औषधं उपलब्ध होती, असंही भारती पवार यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)
तसेच मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं. अनेक रुग्ण तर खाजगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते, ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधं नसतील तर मागणी केली जाते, केंद्र सरकार कडून औषध दिली जातात, या मृत्यू प्रकरणांचा दुसरा सविस्तर अहवाल लवकर येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.