नांदेड : चिथावणीखोर भाषण करणं स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु कालिचरणला भोवलं आहे. नांदेडमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारे हेटस्पीच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकही झाली होती. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ram Navami Kalicharan Hate Speech case FIR has been filed on him at Nanded)
पोलिसांच्या माहितीनुसार, दंगे भडकवणे, विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणे तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध कलमांखाली कालिचरणवर गुन्हा दाखल झाला आहे. रामनवमीनिमित्त छ्त्रपती संभाजीनगरसह देशातील विविध भागात दंगली उसळल्या होत्या. यावरुन सुप्रीम कोर्टानं सरकारला चांगलंच झापलं होतं. लोक खुलेआम चिथावणीखोर भाषण करत आहेत तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवालही कोर्टानं केला होता.
कोर्टाच्या या कठोर टिप्पणीनंतर जाग्या झालेल्या पोलीस प्रशासनानं अखेर कालिचरणवर गुन्हा दाखल केला आहे. नांदेडमध्ये रामनवमीनिमित्त एक सभा झाली होती. या सभेमध्ये कालिचरण यानं विशिष्ट समाजाला टार्गेट करत चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यामुळं मुख्य वक्त्यांवर हा गुन्हा दाखल झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी रायपूर इथं कालिचरणनं २६ डिसेंबर २०२१ रोजी एका धार्मिक कार्यक्रमात महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यानं पुण्यात एका कार्यक्रमात पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान केलं होतं, त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच या प्रकरणात त्याला तुरुंगावसही भोगावा लागला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.