नांदेड : पवित्र रमजानचा तिसरा व अंतिम ( अशरा ) पर्व विसाव्या रोजच्या संध्याकाळपासून प्रारंभ झाला आहे. या अंतिम दहा दिवसीय (Ten days) पर्वात मुस्लिम भाविका (Muslim prayer) तर्फे केली जाणारी सर्वोत्कृष्ट इबादत म्हणजे येतेकाफ ही होय. Ramajan Special: The Best Worship of Holy Ramadan "Yetikaf"
प्रेषक मोहम्मद (स अ )आपल्या काळात हिरा नावाच्या गुफेत रमजानचे अंतिम दहा दिवस येतेकाफ पूर्ण करीत होते अशी हदीस आहे. येतेकाफचा अर्थ पालटणे वा फिरणे असा आहे. भौतिक सुख परिवार, व्यापार, मोह माया समाज या सर्वाचा दहा दिवस त्याग करुन सम्पूर्ण पणे अल्लाहकडे फिरणे म्हणजे येतेकाफ होय. यासाठी दहा दिवस मशिदीमध्ये वास्तव्य करने अनिवार्य असते. येतेकाफ करणाऱ्यास भाविकास "मुताकिफ "असे संबोधले जाते. त्याने रोजा असणे अनिवार्य आहे. यासाठी विसाव्या रमजानच्या संध्याकाळपासून ते ईदच्या चंद्र दर्शनापर्यंत मशिदीत वास्तव्य करावे लागते. या दहा दिवसात इतर सर्व भौतिक व सांसारिक बाबींना त्यागून केवळ आलाहस प्रसन्न करण्यात मग्न होणे अपेक्षित आहे. थेट अल्लाहशी संपर्क जोडण्याचा प्रयत्न या इबादतीत केला जतो.
हेही वाचा - नांदेड : अवघड क्षेत्रातील निकष पात्र शाळा अपात्र; शिक्षणाधिकाऱ्यांची मनमानी
मशिदीमध्ये वास्तव्यामुळे एक तर आध्यात्मिक असे वातावरण प्राप्त होते. दहा दिवस चोवीस तास दैनंदिन पाच नमाजबरोबर नामजे तरावी, तसेच मध्येरात्रीची नामजे तहाजुत, व अनन्य साधारण अशी नामजे सालतु तस्बीह या सर्व बरोबरच कुराण पठण, त्याचा अर्थ समजून घेणे, जिक्र व अस्तगफार क्षमा याचना करने, अल्ल्हास राजी करण्याची याचना करने, शांती, सुख, बंधुप्रेम, मानवसेवा, इडा पीडा टळो आदीसाठी प्रार्थना करणे या सर्व विधी अंतिम पर्वा मध्ये येतेकाफ या इबादतीत केली जाते.
महिला आपल्या घरातील कोपऱ्यात येतेकाफ करु शकतात. रमजानच्या सुरवातीपासून अल्लाहच्या इबादतीत भाविक उत्साहाने व जोमाने मग्न होतो. अंतिम पर्वात इबादतीची ही श्रद्धा चरम सीमा गाठत असते. त्यामुळे भाविक इबाततीत तल्लीन होतात. अशा परिस्थितीत भौतिक सुख व इतर सांसारिक बाबींचा त्याज्य करून भाविक येतेकाफ मध्ये तल्लीन होतो व अल्लाहशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो. अल्लाहला ही इबादत एवढी पसंत आहे की पूर्ण परिसरातील एक व्यक्ती जरी इतेकाफची इबादत करीत असेल तर अल्लाह या मोबदल्यात पूर्ण परिसराचे दुःख निवारण करण्याचे व परिसरातील सर्वांच्या चुकाना क्षमा करण्याचे आश्वासन देतो. वर्षातून केवळ रमजान या पवित्र महिन्यात मुस्लिम भाविकांना अल्लाहस राजी करण्याची हमखास संधी या ये तेकाफ या इबादतीने प्राप्त होते. यामुळे मशिदीत वयस्कर भाविकाबरोबरच युवा वर्गही या इबादतीसाठी तत्पर होत आहे. सध्या कोरोना महामारीच्या लोकडाऊनमुळे शाळा महाविद्यालय व्यापारी प्रतिष्ठान बंद असल्यामुळे बहुतेक मुस्लिम भाविक याचा लाभ घेत येतेकाफ इबादतीत मग्न झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.