नांदेड : एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे जिल्हास्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने ता. 25 मार्च ते ता. पाच एप्रिलपर्यंत सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये ता. 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ केली आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्यात ता. 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे नांदेडमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. ३१) संध्याकाळी हे आदेश जारी केले आहेत.
गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यात आली. मात्र यामुळे नागरिकांची गैरसोय होती हे लक्षात घेऊन शिथिलता देण्यात आली आहे. परंतु यामध्ये नागरिकांना मास्कचा वापर, फिजिकल डिस्टनसचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
काय आहेत प्रशासनाचे नियम?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.