नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांचा राजीनामा म्हणजे जबाबदारी झिडकारण्याचे प्रकार आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी कारखान्याकडे थकलेली एफआरपी, विलंब एफआरपीचे व्याज, आरएसएफची थकित बाकी, २०१३-१४ मधील चौकशीत सिद्ध झालेले साडेपाच कोटी, असे अंदाजे ७० कोटींचा हिशोब देवूनच राजीनामा द्यावा असे आव्हाण ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिले आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण मुख्य प्रर्वतक
माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव उद्योग समूहाची गेल्या दोन दशकांपासून धुरा सांभाळणारे गणपतराव तिडके यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले. राजीनामा मागे घ्यावा यासाठी संचालक मंडळ त्यांची मनधरणी करत आहे. चेअरमन तिडके यांनी राजीनामा दिल्याने प्रल्हाद इंगोले यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला.
हेही वाचा.....बीजोत्पादन कार्यक्रमातून मिळणार गुणवत्तापूर्ण बियाणे
मागील काळात भाजप सरकारवर फोडले खापर
मागील पाच वर्षांत भाजप सरकार कारखानदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणून कारखानदारांनी ऊस उत्पादकांना पैसे न देता पळवाटा काढल्या. आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे कारखानदारांच्या समस्या कायमस्वरुपी सोडण्यासाठी गणपतराव तिडके सारख्या अनुभवी व्यक्तींनी प्रयत्न करून सरकारकडून सहकारी साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून घेणे व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे एफआरपीचे पैसे मिळवून देणे अपेक्षित होते. परंतु असे न करता मागील थकबाकीवर एकही शब्द न काढता तिडके यांनी दिलेला राजीनामा म्हणजे मैदान सोडून जाण्याचा प्रकार आहे.
हेही वाचलेच पाहिजे.....ऑनलाईन इंग्रजी प्रशिक्षणात ‘या’ केंद्राची बाजी
७० कोटींचा हिशोब देवूनच राजीनामा द्यावा
कोरोना हजारांच्या जागतीक समस्येमुळे व देशात असलेल्या लॉगडाउनमुळे आम्ही संयमाची भूमीका घेतली आहे. परंतु आता शेतकऱ्यांचे पैसे कुणी मागणार नाही. अशा भ्रमात कुणीही राहू नये. चेअरमनपद जरी कुणी सोडलं तरी मागील काळात कारखान्याकडे असलेली रक्कम सोडणार नाही. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी कारखान्याकडे थकलेली एफआरपी, विलंब एफआरपीचे व्याज, आरएसएफची थकित बाकी, २०१३-१४ मधील चौकशीत सिद्ध झालेले साडेपाच कोटी, असे अंदाजे ७० कोटींचा हिशोब देवूनच राजीनामा द्यावा असे आव्हाण इंगाेले यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.