Nanded News : माळेगाव यात्रा ‘प्लास्टिकमुक्त’ करण्याचा संकल्प

जिल्हा प्रशासनातर्फे आढावा बैठक; दहा ते चौदा जानेवारीदरम्यान नियोजन
nanded
nanded sakal
Updated on

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील खंडोबाची यात्रा जानेवारी महिन्यात होणार असून या यात्रेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा प्लास्टीकमुक्त यात्रा हा संकल्प यात्रेचा राहणार आहे. दरम्यान, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत माळेगावला शुक्रवारी (ता. १५) बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला.

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नियोजनाच्या दृष्टीने माळेगाव येथे बैठक झाली. या यात्रेतील पावित्र्य, सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड जिल्हा प्रशासनातर्फे केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. त्याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थांनीही अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.

nanded
Nanded News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप

यात्रेतील स्वच्छता ही अधिक महत्वाची आहे. त्या दृष्टीने फिरते स्वच्छता गृह, पाणी पुरवठा, विद्युत, पशुसाठी व्यवस्था, आरोग्याच्या दृष्टीने फिरते चिकित्सालय, रुग्णवाहिका, कृषी प्रदर्शने आदीबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. शाळा, महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी यात्रेमध्ये प्लास्टीक बंदीसंदर्भात जनजागृती करणार आहेत. bn

यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, गटविकास अधिकारी डी. के. आडेराघो, चंद्रसेन पाटील, सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकल्ले, उपसभापती शाम पवार, उपसभापती अण्णाराव पवार, बालाजी वैजाळे, हनुमंत धुळगंडे, विजय वाघमारे, भास्कर पाटील मारताळेकर, केरबाजी धुळगंडे आदीची उपस्थिती होती.

nanded
Nanded News : पतीने मारहाण करून केला पत्नीचा खून

दहा ते चौदा जानेवारी दरम्यान आयोजन

ता. दहा जानेवारी ते ता. १४ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात ता. दहा जानेवारी रोजी देवस्वारी - मिरवणूक व विविध स्टॉल्सचे उद्‍घाटन, ता. अकरा जानेवारीला कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, पशु प्रदर्शन, ता. १२ जानेवारीला कुस्त्यांची दंगल, ता. १३ जानेवारीला लावणी व कलामहोत्सव, ता. १४ जानेवारीला कला महोत्सव व समारोप असे प्राथमिक नियोजन असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

श्रीक्षेत्र खंडोबारायांच्या यात्रेला अधिकाधिक वैभव मिळवून देण्यासाठी मी या भागाचा भूमिपुत्र या नात्याने कटीबद्ध आहे. यात्रा काळात मुलभूत विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यात्रेदरम्यान यात्रेकरूंना स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, दर्शन रांगेतील सुरक्षित व्यवस्था, वीज, पथदिवे, स्वच्छतागृह यासह विशेषतः महिला भगिनींना व अबाल वृद्धांना यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी.

- श्यामसुंदर शिंदे, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.