Rice Dal Rate : ग्राहकांना दिलासा! तांदूळ, डाळीचे दर पाचशेंनी घसरले

श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरवात झाली आहे. त्यात तांदूळ, डाळीच्या किमतीमध्ये क्विंटलला मागे ५०० रुपयांनी घट झाली.
Tur Dal and Rice
Tur Dal and Ricesakal
Updated on

नांदेड - श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरवात झाली आहे. त्यात तांदूळ, डाळीच्या किमतीमध्ये क्विंटलला मागे ५०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात धान्याचे दर कोसळल्याने नागर‍िकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बाजारपेठेत सध्या मंदी असल्याने दर घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून दैनंदिन वस्तूंसोबतच पालेभाज्यांचेही दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. रोजचा द‍िवस काढणे सर्वसामान्यांना अवघड जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या बऱ्यापैकी पाऊस झाला असून पिकांची स्थ‍ितीही चांगली आहे. परंतु, बाजारपेठेत अजूनही म्हणावी तशी खरेदीसाठी रेलचेल दिसून येत नाही. कापड, वस्तूसोबतच मोंढ्यातही म्हणावी तशी रेलचेल नाही.

या मंदीचा परिणाम तांदूळ, तूर, मुग, चना, उडीद डाळी, ज्वारीचे दर घसरणीवर झाला आहे. तसेच डीबीटी तांदूळ पूर्वी ४ हजार ७०० होता आता ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपये क्विंटल, एमएमटी पूर्वी सहा हजार होता आता ५ हजार ५०० रुपये क्विंटल, कोलम पूर्वी ७ हजार २०० होता, आता ७ हजार रुपये क्विंटल झाला आहे, असे व्यापारी कमलाकर बोंडे यांनी सांगितले.

चना डाळ ७० ते ७५ रुपये किलो

यापूर्वी तुरीचे दर १८ हजार रुपये क्विंटल होता. आता १६ हजार ५०० ते १७ हजार रुपये क्विंटल झाला आहे. चनाडाळपूर्वी साडे सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल होती आता, सात ते साडे सात हजार रुपये क्विंटल आहे. मूगडाळ पूर्वी अकरा हजार रुपये क्विंटल होती, आता दहा हजार २०० ते दहा हजार ५०० रुपये क्विंटल आहे. उडीदडाळ पूर्वी १४ हजार रुपये होती आता १३ हजार रुपये क्विंटल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.