Nanded News : आता रुग्णांना मिळणार हाकेच्या अंतरावर आरोग्यसेवा

निवघा-तामसा येथे प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी : कोहळीकर यांची माहिती
nanded
nandedsakal
Updated on

हदगाव : निवघा व तामसा (ता. हदगाव) येथे स्त्री व पुरुष रुग्णांकरीता प्रत्येकी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे याकरीता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते तथा जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करत ही मागणी लावून धरली होती. राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून निवघा व तामसा येथे प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली असल्याची माहीती जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

निवघा (ता. हदगाव) या जिल्हा परिषद गटामध्ये बहुतांश खेडेगावे असून या भागात ग्रामीण रुग्णालय उभारले जावे, जेणेकरून या भागातील नागरीकांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा पुरविली गेली पाहीजे, या भागातील रुग्णांना तालुका अथवा जिल्हा स्तरावर जाऊन उपचार घेणे परवडणारी बाब नाही याकरीता जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी वेळोवेळी प्रशासन व शासन यांच्या दरबारी या भागातील रुग्णांकरीता शासनाकडे निवेदने देत पाठपुरावाही सुरूच ठेवला होता. सोबतच तामसा येथे गेली अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र असून या तामसा शहराला आजूबाजूची जवळपास ४० हुनही अधिक गावे जोडली गेली असून या भागातील नागरीकांनाही आरोग्य सेवेकरीता नांदेड गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. या दोन्हीही मागण्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.

nanded
Nanded News : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नागरिकांकडून विशेष आभार

हदगाव व हिमायतनगर या दोन्हीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या समस्या असून या समस्या सोडविण्याकरीता आपण कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असल्याने या सरकारच्या माध्यमातून केवळ लोकहीताची कामे हाती घेतली जात असून आपण ज्या काही मागण्या आजपर्यंत या सरकारकडे लावून धरल्या त्या सर्वच मागण्या टप्प्याटप्प्याने, एकेकाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत व खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावत आहोतच. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

nanded
Nanded News : ग्रामिण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ

हदगाव व हिमायतनगर या दोन्हीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या समस्या असून या समस्या सोडविण्याकरीता आपण कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असल्याने या सरकारच्या माध्यमातून केवळ लोकहीताची कामे हाती घेतली जात असून आपण ज्या काही मागण्या आजपर्यंत या सरकारकडे लावून धरल्या त्या सर्वच मागण्या टप्प्याटप्प्याने, एकेकाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत व खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावत आहोतच. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.