Nanded : नांदेड जिल्ह्यात स्वस्त दरात वाळू उपलब्ध ; वाळूसाठी डेपो तयार,ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून घेता येणार लाभ

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ता. १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकामासाठी योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे.
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ता. १९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकामासाठी योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे.

काही वाळू डेपो कार्यान्‍वीत झाले आहेत. या डेपोवरुन प्रती ब्रास सहाशे रुपये अधिक इतर कर ७७ रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन ता. एक फेब्रुवारीनुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे. ज्‍या नागरिकांना वाळूची आवश्‍यकता आहे त्यांनी नजीकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा.

nanded
Sand Transport News: मध्यरात्रीनंतर वाळूची बैलगाडीतून वाहतूक; थंडीचा फायदा घेत शक्कल

सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी. वाळू डेपोतून वाळू मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोजी कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान दोनशे ब्रास इतकी वाळू बुकींगची मर्यादा निश्चि‍त केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रती महिना दहा ब्रास इतकी वाळू उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.