धर्माबादेत वाळू माफिया सक्रीय; प्रशासन गांधारीच्या भुमिकेत

कोरोना आजाराने देशात पुन्हा थैमान घातले आहे. प्रशासनातील महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
sand theft
sand theft
Updated on

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : धर्माबाद तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून व संगम नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा करुन टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक धर्माबादेत (dharmabad) केली जात आहे. कोरोना रोगाचा (corona virus) प्रसार रोखण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन व्यस्त आहे. याचा फायदा घेत वाळू माफिया जोमात आहेत. हुनगुंद्याच्या एका रॉयल्टीवर संगम नदीपात्रात दिवसरात्र होत असलेल्या वाळू चोरीबाबत (sand theft) अनेकदा महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. दिवसरात्र वाळू चोरटे धुमाकूळ घालीत असलेले दोन्ही विभागाला माहिती आहे. तरीही महसूल विभाग व पोलिस प्रशासन (civil and police)" डोळे असून आंधळ्याची " भूमिका घेऊन बसले आहेत. यामुळे वाळू चोरट्यांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर पेव फुटले असून वाळू चोरटे जोमात तर प्रशासन कोमात असल्याचे चित्र दिसत आहे. Sand mafia active in Dharmabad; Administration in the role of Gandhari

कोरोना आजाराने देशात पुन्हा थैमान घातले आहे. प्रशासनातील महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लोकांनी घरात राहावे, असे आवाहन करीत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध घातले आहेत. या महाभयंकर संकटात प्रशासन जनहितार्थ व्यस्त आहे. या संधीचा फायदा उठवीत व प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत वाळू चोरांनी मात्र तालुक्यातील संगम नदीपात्राची व गोदापात्राची चाळण करीत धर्माबादेत धुमाकूळ घातला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सदरील वाळूच्या तस्करीत मंडळ अधिकारी व तलाठी सक्रिय झाले असून जवळपास ३५ वाहने धर्माबाद शहरात दररोज वाळूची अवैध उत्खनन करुन क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करीत आहेत.

हेही वाचा - रमजान विशेष : पवित्र रमजानची सर्वोत्कृष्ट इबादत " येतेकाफ "

दिवसरात्र गोदावरी नदीपात्रातून व संगम नदीपात्रातून वाळू चोरी करुन मनूर, बामणी, सिरसखोड मार्ग धर्माबाद शहरात हैदोस घालत आहेत. वाळू माफियांनी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाला " मलिदा " वाटप केल्याची वाळू माफियांत जोरदार चर्चा आहे. यामुळे महसूल विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासन संचारबंदी असूनही विना रॉयल्टीच्या जवळपास ३५ अवैध वाळू वाहतुकीच्या गाड्या दिवसरात्र सुरु असूनही कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. तरी या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

महसुलची यंत्रणा कार्यान्वित नाही

तालुक्यातील संगम व गोदावरी नदी पात्रात वाळू माफियांनी पुन्हा बेसुमार वाळू उपसा करुन सर्रास चोरटी अवैध वाळू वाहतूक सुरु केली आहे. या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने तलाठी, मंडळ अधिकारी यांचे पथक नियुक्ती केले आहे. परंतु महसुलची ही यंत्रणा कार्यान्वित नसल्यासारखेच चित्र आहे. सदरील वाळू चोरट्यांना महसूल प्रशासनाचा अभय मिळत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे शासनाचे रक्षकच भक्षक बनल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.