नांदेड : वाळू माफियांची धुडगूस सुरूच !

उपसा रोखण्याचे प्रशासकीय यंत्रणेला आव्हान : प्रशासन सुस्त
Sand
Sand sakal
Updated on

नवीन नांदेड : वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी जागेची गरजही वाढत चाललेली आहे. त्यामुळे वाळूला असणारी मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे तत्त्व आले की मागणीपेक्षा पुरवठा कमी पडला की अचानक वस्तूची किंमत वाढते हे तत्त्व वाळू व्यवसायालाही लागू पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नदीकाठी अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू असतो ज्याच्याकडे प्रशासन यंत्रना जनू कान्हाडोळा करत आहे. नदी काठच्या अनेक भागात हीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. परिणामी परिसरातील वाळू उपसा रोखण्याचे यंत्रणेला आव्हान असून वाळू माफियांची धुडगूस सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Sand
SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा

वाळूमधील आकर्षक अर्थकारणामुळे नद्यांमधील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरीकरणामुळे आणि बांधकाम व्यवसायातील वाढत्या मागणीमुळे वाळूची मागणी सातत्याने वाढत आहे. गोदावरी नदीकाठांवर जवळपास शेकडोहून अधिक वाळू ठेके आहेत. त्यामुळे वाळू वाहतुकीने अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील मुख्य रस्तेही उद्ध्वस्त झालेले पाहावयास मिळतात. त्यामुळे त्या गावांतून प्रवास करणे सर्वसामान्य वाहन चालकांसाठी जिकिरीचे होत आहे. मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक व होणारा वाळू उपसा हा नियमांच्या पायमल्लीची जीवंत उदाहरणे आहेत. वाळू व्यावसायिकांशी महसूल यंत्रणेचे लागेबांधे असल्याचे आरोप नेहमीच होत असतात. त्यामुळे रक्षकच भक्षक बनल्याने लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे? हा प्रश्न आहे.

‘लोकेशन ऑन दी स्पॉट’

नदीकाठी कोणी नेहमीपेक्षा तिसरा व्यक्ती आला की त्याची माहिती, लोकेशन त्वरित कळविली जाते. त्यावेळी अनेक वेळा सावधगिरी बाळगली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन देण्यासाठी व्यक्तींची मदत घेतली जाते. दरम्यान या वेळी धाड टाकण्यासाठी कुणी येत असल्यास आपल्या स्ट्रॉंग यंत्रांनाद्वारे अवघ्या काही वेळातच त्याची माहिती दूरवर पोहचविल्या जाते. आर्थिक हव्यासापोटी अनेकवेळा शेतकरी सुद्धा आपल्या शेतातून वाळू नेण्यासाठी रस्ता देण्यासाठी मदत करून त्यांना सहकार्य करीत असतात.

Sand
तरुणांना जॉबची सुवर्णसंधी! फेअरपोर्टलचे कार्यालय आता पुण्यात

बांधकामासाठी वाळू आवशकच

बांधकामासाठी वाळू आवशकच आहे. यासाठी अजून तरी पर्याय निर्माण झाला नसल्याने या समस्येवर तोडगा काढण्याचा ठोस प्रयत्न आज तरी झाला नसल्याने मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. दुसरीकडे वाळू उपसा बंदीचा कायदा आहे. वाळू उपशास आळा घालण्यासाठी कारवाया केल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे मात्र बेकायदा वाळूचा उपसाही सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.

वाळू उपसा करण्यासाठी टोळ्या

वाळू उपसा करण्यासाठी जास्त यूपी मधील टोळ्या असल्याचे सांगण्यात येते. या टोळ्यांची गावातच अथवा नदीकाठावर राहण्याची, खाण्याची तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. हे रात्री पासूनच वाळू उपसा करण्याच्या कामाला लागतात. कधी कधी तर भरदिवसा वाळू काढली जाते. नदीपात्रात बांबूच्या सहायाने सुमारे ४० ते ५० फुट खोल वाळू उपसा करण्यात येतो. काढलेली वाळू वाहतूक करून अनेक ठिकाणी साठवून करून जेसीबीद्वारे अनेक हायवा व टिप्पर भरली जातात. नदीपात्राच्या शेजारी व आजू- बाजूच्या शेतामध्ये वाळू साठे असल्याचे दिसुन येतात. या टोळीला कोणी तिसरा व्यक्ती त्यांच्या निदर्शनास आला की ते नदीपात्रात उडी मारून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात. शासकीय यंत्रणाच अशा प्रकारच्या वाळू उपशाला पाठिंबा देत असतील तर मग बेसुमार वाळू उपशाचे प्रकार रोखणार कसे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.