नांदेड : जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात वाळू माफियांनी सर्वत्र हैदोस घातला आहे. रात्री यंत्राच्या साह्याने वाळू घाटावरून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या यंत्रणेची कानउघाडणी केल्यानंतर रविवारी (ता. १०) नांदेड तहसिलच्या पथकाने तालुक्यातील भायेगाव, राहेगाव, किकी, मरघाट, जुना पूल, मुजामपेठ व भनगी परिसरातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केले. यावेळी तीन बोटी, एक जेसीबी आणि एक क्रेन जप्त केले. तर तीन्ही बोटी जाग्यावरच ब्लास्ट करुन नष्ट केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चांगलीच कानउडणी केली. लॉकडाउनमध्ये वाळूचा उपसा करुन वाहतुक कशी काय होते. असा प्रश्न विचारून आपल्या अधिकाऱ्यांना निरूत्तर केले. वाळू माफियांसोबत थेट महसुल विभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट आर्थीक संबंध असतो असे नेहमी बोलल्या जाते. महसुल व पोलिस विभागाच्या आशिर्वादाने वाळू उपसा केल्या जातो. तालुक्यातील काही मंडळ अधिकारी आणि तलाठी हे तर वाळू घाट परिसरातच जासत वेळ घालवण्यास धन्यता मानत असतात. या सर्व बाबी जिल्हाधिकारी यच्या लक्षात आल्याने त्यांनी सर्वाची हजेरी घेतली.
तिन बोटी, एक जेसीबी आणि एक क्रेन जप्त
त्यानंतर मात्र उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि तहसिलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिन पथक कार्यरत केले. त्यात नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांचे पथक भायेगाव , किकी व राहेगाव येथे गेले असता त्या ठिकाणी प्रत्येक गावातील गोदावरी पात्रात प्रत्येकी एक बोट अशा तिन बोटी तसेच एक जेसीबी व एक क्रेन जप्त करण्यात आले. सदर तिनही बोटी जिलेटीनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या.
हे आहेत पथकातील अधिकारी, कर्मचारी
तसेच एक जेसीबी आणि एक क्रेन जप्त करून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये लावण्यात आले. या कारवाईत मंडळ अधिकारी खुशाल घुगे, कोंडीबा नागरवाड, गजानन नांदेडकर, अनिल धुळगंडे, तलाठी कैलास सूर्यवंशी, आकाश कांबळे, विजय रणवीरकर, संताजी देवापूरकर, प्रदीप पाटील, सचिन नरवाडे व राहुल चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग झाले होते.
ब्रम्हपूरी परिसरातून १८ ब्रास वाळू जप्त
दुसऱ्या एका कारवाईत ब्रह्मपुरी (ता. नांदेड) शिवारात तलाठी रवी पल्लेवाड यांनी मरघाट, जुनापूलजवळ तराफेद्वारे उपसा केलेली १८ ब्रास वाळू जप्त केली. जप्त केलेली वाळू जायमोक्यावरच लिलाव करून लिलाव धारक यांचे ताब्यात दिली.
येथे क्लिक करा - सावधान : नांदेडमध्ये कोरोनाचे अर्धशतक पूर्ण
वाळू माफियांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई
तिसऱ्या कारवाईत भनगी शिवारात गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तिसरे पथक या ठिकाणी पोहचले. पथकाला एक वाळूचा टेंपो पकडून जागेवरच दंड वसूल करून शासकीय तिजोरीत जमा केला. या पुढेही वाळू माफियांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई चालू राहिल, असे तहसिलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.