नांदेड : आवर्षण प्रणव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात मागील पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता अद्याप जाणवली नाही. जिल्ह्यातील मोठ्या, लहान, मध्यम, लघू, उच्चपातळी बंधारे व कोल्हापूरी बांधारे असे एकूण ११२ प्रकल्पात २९५.४२ दशलक्ष घनमीटर नुसार ३९.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे मागील काही वर्षापासून जिल्ह्यात जाणवणाऱ्या टंचाईला दिलासा मिळाला आहे.
वार्षीक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस
मागील वर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये १६१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर एक हजारच्यावर खाजगी विहिरी तसेच कूपनलिकेचे अधिग्रहण करून ग्रामीण आणि नागरी भागात लोकांना पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाल्यामुळे जिल्ह्यातील ११२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांना ही या प्रकल्पाचा फायदा झाला.
हेही वाचा.....
मागील वर्षी होते १६१ टॅंकर
मागील वर्षी पावसाळ्यामध्ये सुरू झालेले टँकर जून-जूलैपर्यंत सुरु होते. जिल्ह्यात एकूण १६१ टॅंकर वाढले होते. परंतु यंदा अद्याप एकाही ठिकाणी टँकर सुरू झाले नाही. सध्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडा सुरु आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पाची स्थिती समाधानकारक असल्यामुळे आगामी दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील प्रकल्पात आहे. यामुळे यंदा ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलेच पाहिजे.....
प्रकल्पनिहाय पाणीसाठा
मानार प्रकल्पात ७२.६५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.५६ टक्के पाणीसाठा आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ३३.६६ दशलक्ष घनमीटरनुसार ४१.६६ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ५८.५९ दशलक्ष घनमीटरनुसार ४२.१३ टक्के पाणीसाठा आहे. तर नऊ उच्चपातळी बंधाऱ्यात ७९.१९ दशलक्ष घनमीटरनुसार ४१.७१ टक्के पाणीसाठा आहे. ८८ लघु प्रकल्पात ५०.८८ दशलक्ष घनमीटरनुसार २६.६७ टक्के पाणीसाठा आहे. तर चार कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.४६ दशलक्ष घनमीटरनुसार ६.१८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकूण ११२ प्रकल्पात २९५.४२ दशलक्ष घनमीटरनुसार ३९.५९ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यानजीक असलेल्या येलदरी प्रकल्पात ५५७.०७ दशलक्ष घनमीटरनुसार ६८.७९ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात ३०.३२ दशलक्ष घनमीटरनुसार ३७.४५ टक्के तर इसापुर प्रकल्पात ४१९.७३ दशलक्ष घनमीटरनुसार ४३.५४ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाकडून देण्यात आली.
यंदा जलसाठ्यात लक्षणीय वाढ
मागील वर्षी याच काळात जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ४८ दशलक्ष घनमीटरनुसार केवळ ६.४३ टक्के पाणीसाठा होता. यंदा पावसाळ्याच्या शेवटी पावसाने जोर लावल्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठे, नऊ मध्यम, ८८ लघू, आठ उच्च पातळी बंधारे तसेच चार कोल्हापुरी बंधारे, अशा एकूण ११२ प्रकल्पात २९५.४२ दशलक्ष घनमीटरनुसार ३९.५९ टक्के पाणीसाठा आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची स्थिती
प्रकल्प.................दलघमी.................टक्केवारी
विष्णुपुरी...............३३.६६..................४१.६६
मानार..................७२.६५..................५२.५६
मध्यम प्रकल्प.........५८.५९..................४२.१३
उच्च पातळी बंधारे.....७९.१९..................४१.७१
लघू प्रकल्प............५०.८८..................२६.६७
कोल्हापुरी बंधारे.......००.४६..................०६.१८
एकूण...................३९.५९..................३९.५९
जिल्ह्याशेजारील प्रकल्पांतील पाणीसाठा
उर्ध्व पैनगंगा...........४१९.७३..................४३.५४
येलदरी.................५५७.५७..................६८.७९
सिद्धेश्वर.................३०.३२..................३७.४५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.