नांदेड : जिल्ह्यातील सर्वच दारु दुकाने मंगळवारी (ता. १९) सकाळापासून सुरू झाले आहे. मात्र या दुकानावर ग्राहकांची गर्दी होउ नये म्हणून बॅरिकेट्स लावून ग्राहकांना अंतरवार उभे रांगेत करण्यात आले आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रत्येक ग्राहकांची स्क्रीनींग केल्या जात असून होणाऱ्या गर्दीवर स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन, उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर हे लक्ष ठेवून आहेत.
ऑनलाईन दारुची विक्रीमधील गोलमाल आणि शासनाची होणारी फसवणूक पाहता मंगळवार (ता. १९) पासून दारूच्या दुकानांवर ग्राहकांना दारू विकत मिळणार आहे. यासाठी सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानांसमोर रांगा लावायला सुरुवात केली होती. सर्वच दुकानासमोर राज्य उत्पादन शुल्क व पोलिस गर्दी करणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवून होते.
ग्राहक मंडळींकडून दुकानांसमोर गर्दी
जिल्ह्यात शनिवार (ता. १६) पासून विदेशी दारूची ऑनलाईन मागणीप्रमाणे घरपोच सेवा सुरु झाली होती. यास फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. ऑनलाईन विक्रीस परवानगी असताना ग्राहक मंडळींकडून दुकानांसमोर गर्दी करू लागले होते. ग्राहकांची होणारी गर्दी पाहून व्यापाऱ्यांनी रविवारी (ता. १७) दुकानांचे शटर बंदच ठेवले होते. शटर बंद असले तरी आतून दारु विक्रीचा कारभार सुरू होता. अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या.
सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंतच दुकाने उघडे राहणार
हे सगळे प्रकार व ऑनलाईनला मिळणारा अल्पप्रतिसाद पाहता जिल्हाधिकारी डॉ. विपुल यांनी सोमवार (ता. १८) मे रोजी देशी, विदेशी व बिअरशॉपी उघडण्यास दारु विक्रेत्यांच्या बैठकीनंतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली. सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंतच दुकाने उघडे राहणार आहेत. रांगेत २५ जणांना उभे राहता येणार असल्याने ग्राहकांनी सकाळी पाच वाजल्यापासून नांदेड शहरातील दुकानांसमोर गर्दी करायला सुरुवात केली होती.
येथे क्लिक करा - अन्न व्यावसायीकांनो आरोग्याच्या दृष्टिने उपाययोजना करा- एफडीए
प्रशासनाच्या लॉकडाउनच्या सुचनांचे पालन
शहरातील सर्वच वाईन शॉप, देशी दारू दुकान व बिअर शॉपीसमोर गर्दी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दारु दुकानांसमोर गर्दी पहावयास मिळत होती. गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना रांगेत एक मीटर अतंरावर उभे करण्यात आले होते. यासाठी दुकानासमोर पोलिसांचा पहारा देण्यात आला होता. ग्राहकांनी संयम व गर्दी गोंधळ करता तसेच प्रशासनाच्या लॉकडाउनच्या सुचनांचे पालन करत दारु खरेदी केली तर भविष्यात दारु दुकान दिवसभर सुरु ठेवणय्चा निर्णय घेतल्या जाईल असे निलेश सांगडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.