माहूर ( जिल्हा नांदेड) : वाहकाने एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना शुक्रवारी (ता. २६) रोजी सकाळी सहा वाजत उघडकीस आली. माहूर आगाराची परळी- माहूर ही बस (एमएच २० बी.एल.४०१५) ही माहूरच्या एसटी आगारात (ता. २५) च्या रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७: ३० ची असल्याने (ता. २६) रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छ करण्यासाठी गेले असता सदर बसमध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत वाहक संजय संभाजी जानकर हे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आगारप्रमुख व्ही. टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीवरुन माहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. बिट हवालदार श्री. आडे, श्री. मुटकुळे, श्री. गंगाधर खामनकर, प्रकाश देशमुख यांचेसमवेत श्री. आडे यांनी घटनास्थळ पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठविला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले. सदर वाहकाची (ता. २४) रोजी धनोडा येथे बस तपासणी पथकाने केली. त्यावेळी तिकीट मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याने सदर बाब वरिष्ठांनी लक्षात न घेता कारवाई करण्याचे संकेत दिल्याने पश्चाताप होऊन आत्महत्या करणाऱ्या वाहक जानकर यांनी रापम माहूर आगाराच्या व्हाटसप ग्रुपवर (ता. २६) रोजी सकाळी चार वाजता व्हायरल केलेल्या लेखी मृत्यूपूर्व जबाबात नमूद केले आहे.
सदर वाहक हा तुटपुंजा पगारामुळे नेहमी आर्थिक विवंचनेत राहत असल्याने व यापूर्वीही काही दिवस सदर वाहक हा निलंबित राहिलेला असल्याने आता पुन्हा निलंबन झाले तर कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची या विवंचनेत गेल्या दोन दिवसापासून होता. अशी कुजबुज रापम कर्मचाऱ्यामध्ये होती.घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नामदेव रिठे यांचे मार्गदर्शनात हवालदार विजय आडे करीत आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.