हिमायतनगरमध्ये खळबळजनक घटना: कामारवाडीत प्रेमी युगलाची आत्महत्या

हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील अविवाहित दत्ता गणेश भिंगोरे (वय 24 ) व विवाहित शारदा खंडू माने (वय 25) रा. चिकाळा ह. मु. कामारवाडी यांच्यात प्रेम संबंध जुळवून आले
हिमायतनगरमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या
हिमायतनगरमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या
Updated on

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील कामारवाडी (Himayatnagar) येथे '' साथ जियेंगे साथ मरेंगे " च्या अणाभाका घेत प्रेमी युगलानी (Loving couple suicied) लिंबाच्या झाडाला लायलोन दोरीनी गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी (ता. 22) पहाटे तीनच्या सुमारास घडली. (Sensational- incident- in- Himayatnagar- Suicide- of a loving- couple- in -Kamarwadi)

हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील अविवाहित दत्ता गणेश भिंगोरे (वय 24 ) व विवाहित शारदा खंडू माने (वय 25) रा. चिकाळा ह. मु. कामारवाडी यांच्यात प्रेम संबंध जुळवून आले. विशेष म्हणजे नवर्‍याशी जमत नसल्याने विवाहिता ही गेल्या चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथेच वास्तव्यास होती. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली. शारदा ही विवाहित असल्याने दत्ता यांच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेम संबंधाला टोकाचा विरोध दर्शविला असावा. आता दत्तांच्या घरच्यांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले होते. सोयरीकही जुळवून आली होती. परंतू दत्ताने शारदा सोबत " साथ जियेंगे साथ मरेंगेच्या अणाभाका घेतल्या होत्या. दत्ताचे लग्न होणार असल्याने शारदाला त्याच्यापासून कायमचे दुर व्हावे लागणार होते. आगामी काळात येणाऱ्या विरहाचा विचार करून दोघेही विचारमग्न होते.

हेही वाचा - 'म्युकरमायकोसिस’आजारावरील औषधाचा पुरेसा पुरवठा करा

अखेर टोकाचा निर्णय घेत शनिवारी (ता. 22) पहाटे तीन वाजताच्या दरम्यान गांवाशेजारील चंद्रकुमार गणपतराव वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लायलोन दोरीने गळफास घेऊन दोघांनीही या जगाचा निरोप घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडी गावचे पोलिस पाटील नागोराव गोविंदराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला व दोघांचेही प्रेत हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण नाईक, आरोग्य सेवक संतोष नारखेडे यांनी शवविच्छेदन करून दोघांचेही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कामारवाडी येथे दुपारी उशिरा एकाच चित्तेवर या दोघांनाही चित्ताअग्नी देण्यात आला. या गंभीर घटनेचा अधीक तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हेमंत चोले तपास करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()