नांदेड : विश्रांतीनंतर नांदेड आगाराला सात हजाराचे उत्पन्न

कंधार आगाराच्या दोन गाड्या, वसमत-परभणी आगाराची एक बस येऊन परतली
ST Bus
ST Busesakal
Updated on

नांदेड : नांदेड विभागाला(nanded divison) कधी काळी दिवसाला दहा लाखाचे उत्पन्न मिळत होते. कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. रविवारी (ता.दोन) कंधार आगाच्या दोन तर वसमत - परभणीहून प्रवासी घेऊन आलेल्या बसच्या माध्यमातून नांदेड आगारास सात हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. एसटी महामंडळाचे (msrtc)राज्य शासनात विलनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे बस चालविण्यासाठी चालक-वाहक कामावर परत न आल्याने अनेक विभागातील एसटीची चाके आजही थांबलेलीच आहेत. एसटी बंद असल्याने प्रवाशांचे विशेष करुन शालेय-महाविद्यालयीन व ज्येष्ठ नागरीक यांना प्रवासा दरम्यान जादा पैसे तर मोजावेच लागताहेत शिवाय प्रवासादरम्यान चढ उतर करताना त्यांची चांगलीच फरफट होत आहे.

ST Bus
बारडच्या युवा शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

दोनदिवसापूर्वी लातूर आगाराची एक बस नांदेड आगारात येऊन गेल्यानंतर रविवारी पुन्हा कंधार तालुक्यातील दोन बस मधून जवळपास ५५ प्रवाशांनी चढ उतर केली. यातून पाच हजार रुपयाचे उत्पन्न झाले. तर वसमत डेपोची एक बस परभणीहून २० ते २२ प्रवासी घेऊन पोलिस बंदोबस्तात नांदेडच्या एसटी बसस्थानकात दाखल झाली होती. त्यातून दोन हजार रुपयाचे उत्पन्न असे मिळून तब्बल दोन महिण्यानंतर नांदेड एसटी आगारास सात हजार रुपयाचे उत्पन्न झाल्याची माहिती बसस्थानक प्रमुख श्रीमती येरेकर यांनी दिली आहे. असे असले तरी, नांदेड आगारातील एकही कर्मचारी कामावर परत येण्याच्या मनस्थिती मध्ये दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर परत या अशी विनवणी करताना वरिष्ठांच्या डोक्याचा तान वाढत आहे.

ST Bus
नांदेड : लसीकरणयुक्त आणि कोरोनामुक्त नांदेड व्हावे

कर्मचाऱ्यांकडुन उत्तर येणे अपेक्षित

नांदेड आगारातील संपावर असलेल्या कामगारांपैकी ५५ पेक्षा अधिक कामगारांना यापूर्वीच निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटीसीला त्यांच्याकडुन अपेक्षित उत्तर न आल्यास त्यांच्यावर निलंबणाची कारवाई होणार हे निश्‍चित मानले जात आहे. आज सोमवारी अनेक कर्मचाऱ्यांकडुन उत्तर येणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच वरिष्ठांकडुन देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी निमक्या किती कर्मचाऱ्यांना निलंबणाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार हे बघणे उचित ठरणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.