अर्धापूरात मेंढपांळांचा पारंपारिक वेषात तहसीलवर मोर्चा

मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ आर्मीच्या पुढाकारातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
ardhapur
ardhapurardhapur
Updated on
Summary

मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ आर्मीच्या पुढाकारातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

अर्धापूर (नांदेड): तालुक्यातील मेंढपाळांनी आपल्या विविध मागण्या, अडचणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारंपारिक वेषात मोर्चा काढून तहसीलदारांना शुक्रवारी (ता सहा) निवेदन दिले. या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मोर्चेकरी काढी, घोंगडी, पटका, साहित्य ठेवण्याची पारंपरिक पद्धतीची पिशवी घेऊन आले होते. शेळ्या मेंढ्यांना चरण्यासाठी वनविभागाकडे राखीव क्षेत्र ठेवण्याची मागणी करण्यात आली. तसेच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली.

मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ आर्मीच्या पुढाकारातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील मैदानातून सुरू झाल्यावर बसवेश्वर चौक मार्गाने तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. नायब तहसीलदार इटकपल्ले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात प्रत्येक वनक्षेत्रात मेंढ्यांसाठी चराईक्षेत्र राखून ठेवणे, मेंढपाळ, पशुपालक व वनाधिकारी यांच्यात समन्वय राहण्यासाठी शिबिर घेण्यात यावे, वनविभागाच्या क्षेत्रातील पाणीसाठे मेंढ्यांसाठी उपलब्ध करून देणे, शासकीय गायरानावर शेळ्या मेंढ्यांना चरण्यासाठी परवानगी देणे यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले.

ardhapur
मंठ्यात गटविकास अधिकाऱ्यांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या मोर्चात मेंढपाळ आर्मीचे तालुका अध्यक्ष अमृत खोंडे, संजय साखरे, दयानंद बेळगे, व्यंकटी साखरे, सचिन येवले, हरी बारसे नवनाथ बारसे, बाबुराव कानोडे, पिराजी साखरे, छत्रपती कानोडे, प्रविण देशमुख, राजु शेटे, सोनाजी सरोदे, राजु निकम, चंद्रकांत निकम, साहेबराव येवले, सोपान येवले, नागोराव बारसे, नवनाथ बखाल, देवीदास बखाल, आनंद बारसे, देवीदास बारसे, मारोती बेळगे, संभाजी खरबे, गणपत डोले यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने मेंढपाळ पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले. घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.