Video ः धक्कादायक... पोटच्या गोळ्याला फेकले शिवारात

IMG-20200513-WA0043.jpg
IMG-20200513-WA0043.jpg
Updated on


फुलवळ, (ता. कंधार, जि. नांदेड) ः दोन दिवसांपूर्वीच (ता. दहा) जागतिक मातृदिन साजरा झाला आणि बुधवारी (ता. १३) त्याच मातृत्वाला काळिमा फासणारी व मन सून्न करणारी दुर्दैवी घटना फुलवळ शिवारातील ‘एमआयडीसी’च्या शेजारी असलेल्या शेतात निदर्शनास आली. अंदाजे चार- पाच दिवसांपूर्वी जन्मलेले पुरुष जातीचे जिवंत बालक कोण्या अज्ञात व्यक्तीने टाकून गेल्याने फुलवळ परिसरासह कंधार तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून अशा निर्दयी गुन्हेगाराचा पाठपुरावा करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

बुधवारी (ता. १३) फुलवळ येथील ‘एमआयडीसी’च्या शेजारी राजानंद नारायणराव मंगनाळे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने या नवजात बालकाला सूती स्कार्फमध्ये गुंडाळून त्याचा चेहरा वगळता बाकी शरीराभोवती मातीचा ढीग लावून ते त्या बालकाला लावरीसपणे सोडून गेले. राजानंद मंगनाळे यांचा मुलगा श्रीकांत मंगनाळे हा त्याच्या मित्रांसोबत पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी गेला असता अचानक बांधाजवळ लिंबाच्या झाडाखाली बंडाचा नाला आहे त्या ठिकाणी अचानक एक नवजात बालक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रस्त्यावरून गाडीवर जात असलेल्या गणेश मंगनाळे व गंगाधर शेळगावे यांना आवाज देऊन बोलावून घेतले ते दाखवले. तेंव्हा तत्काळ गणेश मंगनाळे आणि गंगाधर शेळगावे यांनी फुलवळ येथील ‘सकाळ’चे बातमीदार धोंडिबा बोरगावे यांना फोन करून सदरची माहिती दिली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता धोंडिबा बोरगावे, आनंद पवार, तुकाराम फुलवळे, राजू राठोड, धोंडिबा मंगनाळे हे घटनास्थळी पोचले.


घटनास्थळाचा पंचनामा
त्यानंतर धोंडिबा बोरगावे यांनी कंधार पोलिस ठाणे व आरोग्य उपकेंद्र फुलवळ येथे या घटनेची माहिती कळविली. सध्या चालू असलेल्या कोरोना संसर्ग साथीचा कसलाच विचार न करता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्या बालकास तत्काळ कंधार येथे हलविण्यात आले. माहिती मिळताच आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक कर्मचारी सुधाकर मोरे, रामेश्वर फुलवळे आरोग्य सेविका लतिका मुसळे हे हजर झाले. ते नवजात बालक हे जिवंत आहे आणि त्याच्या अंगा-तोंडावर मुंग्या लागल्या आहेत, हे पाहून कंधार पोलिस ठाण्याची परवानगी घेऊन त्या बालकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे पोचविले गेले. तोपर्यंत घटनास्थळाला पोलिस प्रशासनाचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव, एस. एन. काळे, पी. सी. तलवारे, ए. एच. केंद्रे यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
सदर बालकास कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. निलेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. सध्या ते बाळ सुखरूप असून त्याचे रडणे, बागडणे व्यवस्थित सुरू असल्याने अन्य धोक्यापासून ते सुखरूप आहे. परंतु, ते शेतात उघड्यावर सापडले असल्याने एवढ्या लहान बालकांवर इन्फेक्शन होऊ शकते यासाठी त्याच्या काही तपासण्या कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही लवकरच शासकीय रुग्णालय नांदेड येथे रेफर करू, असे डॉ. निलेंद्र वर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. फुलवळचे पोलिस पाटील इरबा देवकांबळे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.