लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा व परीसरात मागिल अनेक कालावधीपासून मुलींना फुस लावून पळविणे व त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेण्याचे रॅकेट कार्यरत होते. त्या रॅकेटचा लोहा पोलिसांनी फर्दाफास केला असून रॅकेटमधील सहभागी चार महिला व तीन पुरुष आरोपींना गजाआड केले. यातील दोघींना न्यायालयीन तर दोघींना पोलीस कोठडी आणि तीन पुरुष आरोपींना (ता.२१ जून) पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार महिन्यांपूर्वी लोहा पोलिसात पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली होती.
लोहा शहरातील इंदिरानगर भागातील पस्तीस वर्षीय महिलेने (ता. चार) फेब्रुवारी म्हणजे चार महिन्यांपूर्वी लोहा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यात असे नमूद करण्यात आले होते की, आरोपी कमलबाईने माझ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तसेच मला कांहीही माहिती न लागू देता तिच्याशी अनैतिक कृत्य करण्यासाठीच तिला पळवून नेले. यासंदर्भाने मी आरोपींशी माझ्या मुलीबाबत विचारणा केली असता आरोपीने मला थापड बुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - तो’ तांदूळ सरकारी वितरणाचाच- गुन्हा दाखल
लोहा पोलिसांची कारवाई, चाईल्ड लाईनचाही पाठपुरावा
मागिल अनेक महिन्यांपासून लोहा पोलीस तक्रारीच्या अनुषंगाने तपासावर होते. आरोपीचा पत्ता गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी ताण्याबाई उर्फ विमालबाई अशोक जाधव (वय ४८) रा. पेनूर ता. लोहा हिस पेनूर येथून तर कमलाबाई मोहन ऐंगडे (वय ४८) रा. इंदिरानगर लोहा हिस हैदराबाद येथून दहा दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आरोपींना पोलिस कोठडी
त्यानंतर सदर रॅकेटमधील इतर आरोपीपैकी विमलबाई खंडू पाईकराव (वय ५५) रा. बेलानगर, नांदेड व महानंदाबाई रोहिदास वाठोरे (वय ४५) रा. पांडुरंगनगर, नांदेड यांना नांदेड येथून ताब्यात घेतले. व न्यायालयासमोर हजर केले त्यांना (ता. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर गेनूभाऊ आबाजी हिंगे रा. अवसारी जि. पुणे, मदन किशन गिरी रा. सतेगाव ता. पालम व राहुल बंडूराव ढवळे रा. विष्णुनगर नांदेड यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना (ता. २१) पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रॅकेटमध्ये इतरही आरोपी असावेत असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
येथे क्लिक करा - जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा खून
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लोहा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, अॅड. अंजली जोशी, सहाय्यक पोलिस निरिक्षक रवींद्र क-हे, फौजदार गुलाबसिंह राठोड, हवालदार बालभारती, वसंत केंद्रे, बलवान कांबळे, शेषेराव शिंदे, सविता जोंधळे आदींसह पोलीस पथकाने सदर कामगिरीत सहभाग घेतला.
पालमसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल
या रॅकेटमधील आरोपीविरुद्ध पालम सह इतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी विकणे आदी प्रकरणी गुन्हा नोंद आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आसून पुढील तपास भागवत जायभाये करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.